श्राद्धाला जेवणाऐवजी केले साडी???????

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST2021-07-03T04:17:11+5:302021-07-03T04:17:11+5:30

रूकडी माणगाव रूकडी : येथील एकनाथ कुलकर्णी व आनंद कुलकर्णी या बंधूंनी आईच्या वर्षश्राद्धातील जेवणावळीला फाटा देत कोरोनाकाळात गावाची ...

Shraddha made sari instead of meal ??????? | श्राद्धाला जेवणाऐवजी केले साडी???????

श्राद्धाला जेवणाऐवजी केले साडी???????

रूकडी माणगाव

रूकडी : येथील एकनाथ कुलकर्णी व आनंद कुलकर्णी या बंधूंनी आईच्या वर्षश्राद्धातील जेवणावळीला फाटा देत कोरोनाकाळात गावाची सेवा करणारे सेवेकरी यांना किराणा साहित्य व साडीचा आहेर देऊन कृतज्ञता जोपासली. प्रथेला छेद देत रूकडी येथील कुलकर्णी बंधूंनी ग्रामपंचायत कर्मचारी यांना जीवनावश्यक वस्तू भेट देत मानवतेचे दर्शन घडविले. तसेच ग्रामपंचायत महिला सफाई कर्मचारी यांना साडीचोळी भेट देत माणुसकी ही जोपासली. कुलकर्णी बंधूंच्या मातोश्री मथुरा यांचे गतवर्षी निधन झाले. त्यांचे वर्षश्राद्ध प्रसंगी घरीच साधे विधी करत पै पाहुणे यांना आमंत्रित न करता ग्रामपंचायत कर्मचारी यांना शिधा व महिला कर्मचारी यांना साडीचोळीसह रुकडी येथे कोविड सेंटरला ५0 मास्क, ५0 सॅनिटायझर व येथील कोरोनाग्रस्त यांना २000 रुपये देऊन आईविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Shraddha made sari instead of meal ???????