शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात, केंद्रात सत्ता मग तुम्हाला कोल्हापूरच्या हद्दवाढीपासून कोणी रोखले, काँग्रेसची विचारणा 

By राजाराम लोंढे | Updated: June 25, 2024 19:36 IST

कोल्हापूर : हद्दवाढ आम्ही केली नाही म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्यांची आता राज्य व केंद्रात सत्ता आहे, मग त्यांना हद्दवाढीपासून ...

कोल्हापूर : हद्दवाढ आम्ही केली नाही म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्यांची आता राज्य व केंद्रात सत्ता आहे, मग त्यांना हद्दवाढीपासून कोणी रोखले? अशी विचारणा करत शौमिका महाडीक यांचा विधानसभा निवडणूकीसाठीच ही स्टंटबाजी असल्याचा टोला काँग्रेसच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषदेत लगावला.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीनी हद्दवाढीला पाठींबा देणारे ठराव करावेत, असे आव्हान भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडीक यांनी आमदार सतेज पाटील यांना दिले होते. महापालिकेमध्ये अनेक वर्षे दोन्ही काँग्रेसची सत्ता हाेती, पालकमंत्रीही त्यांचे होते मग हद्दवाढ का केली नाही? सचिन चव्हाण यांनी आपल्या आमदारांना काळे झेंडे का दाखवले नाहीत असा सवालही त्यांनी केला होता. यावर, सचिन चव्हाण यांनी मंगळवारी पलटवार केला.काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, हद्दवाढ विरोधी कृती समितीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी असतात, तिथे सर्वानुमते निर्णय घेतले जातात. या चळवळीत काम करण्याचा अधिकार मला घटनेने दिला आहे. स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांच्या पासून गेली ५० वर्षे आम्ही हद्दवाढीच्या बाजूनेच भूमिका घेतली. त्यामुळे आम्हाला कोणी सांगत बसू नये. आम्ही व आमचे नेते सतेज पाटील सक्षम असून तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही.सतेज पाटील यांनी थेट पाईप लाईन, केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरणासह अनेक विकासाची कामे केली, हे कोल्हापूरच्या जनतेला माहीती आहे. आता महापालिकेवर प्रशासक आहे, राज्य व केंद्रात तुमची सत्ता आहे. मग आता हद्दवाढ करायला तुम्हाला कोणी रोखले? हद्दवाढ व्हावी म्हणून तुम्ही महापालिकेत किती बैठका घेतल्या, शासन पातळीवर कोणते प्रयत्न केले? याचे उत्तर महाडीक यांनी द्यावीत. यावेळी संजय पोवार-वाईकर उपस्थित होते.अमल महाडीक यांचे पत्र योग्य वेळी बाहेर काढूमहाडीक यांनी हद्दवाढीबाबात दुटप्पी भूमिका बंद करावी, अमल महाडीक हे आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हद्दवाढ करु नये, असे पत्र दिले होते. त्याची प्रत माझ्याकडे असून याेग्य वेळी बाहेर काढू, असा इशारा चव्हाण यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा