शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

खोडा घालायला मी पाटील नाही, महाडिक आहे; शौमिका महाडिक यांचा सतेज पाटलांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 1:28 PM

कोल्हापूर : ‘ गोकुळ’मध्ये गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी चुकीच्या मार्गाने सुरू आहेत, त्याला त्या-त्यावेळी जाब विचारला आहे. रमजान ईदला ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी चुकीच्या मार्गाने सुरू आहेत, त्याला त्या-त्यावेळी जाब विचारला आहे. रमजान ईदला दरवर्षी उच्चांकी दूध विक्री होतेच. पण, यावेळेला २० लाख लिटरची विक्री झाल्याबद्दल संघ प्रशासनाचे अभिनंदन करते. चांगल्याला चांगले म्हणण्याची महाडिक कुटुंबाची रीत आहे. त्यामध्ये खोडा घालायला मी पाटील नाही, महाडिक आहे, असा पलटवार ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर केला.महाडिक म्हणाल्या, ‘गोकुळ’च्या निवडणुकीत नाहक बदनामी करून सत्ता मिळवली. मात्र सध्या नेते मंडळींचा हस्तक्षेप सुरू आहे, तेवढा कधीच महादेवराव महाडिक यांनी केला नाही. ग्राहकांवर बोजा टाकून उत्पादकांना दरवाढ केल्याबद्दल आम्हाला विचारणाऱ्यांनी आता काय केले, याचे उत्तर द्यावे. मुंबईत ३५० कोटींचा जागा खरेदीचा डाव आपण हाणून पाडला. जमीन लाटण्याचा आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी देवस्थानच्या जमिनी लाटून साम्राज्य उभे केले, ‘गोकुळ’मध्येही तेच करत आहेत.लाखो लिटर दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर अवलंबून आहेत. ईर्ष्या निवडणुकीपुरती असावी, संघाचे नुकसान होईल, असे कोणी वागू नये. मुंबई, पुण्यातून दुधाच्या प्रतीबाबत तक्रारी असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.

मी ३० वर्षाचा हिशेब देते....

‘गोकुळ’मध्ये गेल्या ३० वर्षात दूध उत्पादकांचे हितच जोपासले गेले. मी ३० वर्षाचा हिशेब देते, तुम्ही गेल्या वर्षभरातील द्या. उठसूठ खोटे बोलणे जास्त दिवस टिकत नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.

महिला सन्मानाच्या गप्पा बंद करा‘गोकुळ’च्या निवडणुकीत महिलेला पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडलेल्या मंडळींनी ‘उत्तर’च्या पोटनिवडणुकीत महिला सन्मानाची भाषा केली. महिला संचालिकेला संघातील माहिती देऊ नका, असे सांगणाऱ्यांनी या गप्पा बंद कराव्यात, असे महाडिक यांनी सांगितले.

मुश्रीफ हस्तक्षेप करत नाहीत

माझ्यासोबत निवडून आलेल्या सहकाऱ्यांवर काही बंधने आहेत. त्यातच निवडणुकीत महाडिकांवर आरोप करून सत्ता मिळवल्याने मलाच उत्तर द्यावे लागेल. संघाच्या कामकाजात पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप अधिक असून मंत्री हसन मुश्रीफ हे हस्तक्षेप करत नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील