संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:20 IST2020-12-23T04:20:54+5:302020-12-23T04:20:54+5:30

कोल्हापूर : भाजप युवा मोर्चा अल्पसंख्याक संयोजकपदी नाजीम इकबाल अत्तार यांची निवड झाली. बिंदू चौकातील कार्यालयात जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

कोल्हापूर : भाजप युवा मोर्चा अल्पसंख्याक संयोजकपदी नाजीम इकबाल अत्तार यांची निवड झाली. बिंदू चौकातील कार्यालयात जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी निवडीचे पत्र दिले. यावेळी अशोक देसाई, वैशाली खाडे, विजयसिंह खाडे, पृथ्वीराज यादव उपस्थित होते.

(फोटो: २२१२२०२०-कोल-नाजीम अत्तार निवड)

हिंदू महासभा जिल्हाध्यक्षपदी संदीप सासने

कोल्हापूर : अखिल भारत हिंदू महासभा राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप निवृत्ती सासने यांची निवड झाली. प्रदेशाध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी निवडीचे पत्र दिले. (फोटो : २२१२२०२०-कोल-संदीप सासने निवड)

ताईबाई गल्ली रेणुका भक्त मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील श्री ताईबाई गल्ली रेणुका भक्त मंडळाने वर्धापन दिनानिमित्त यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. माजी महापौर हसिना फरास यांच्या अध्यक्षतेखाली व मंडळाचे संस्थापक अच्युत साळोेखे यांच्या संयोजनाखाली झालेल्या या कार्यक्रमात सौंदत्ती यात्रा कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरच आयोजन करण्याचे ठरले. प्रा. कालिंदी रानभरे, प्रा. वैभवा साळोखे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी आदिल फरास, बबन लोखंडे, कमलाकर खोत, अरुण पोवार, प्रशांत चांदेकर, चंद्रकांत चव्हाण, राजेश शिंदे, दीपक लोखंडे यांची उपस्थिती होती.

Web Title: Short story