संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:29+5:302021-02-09T04:26:29+5:30

यड्राव : येथील पूर्वाभिमुखी गणेश मंदिरामध्ये गणेश जयंतीच्या निमित्ताने ‘श्री गणेश पुराण कथासार’ पारायणास प्रारंभ झाला. ध्वजपूजन, गणेशपूजन गोपाळ ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

यड्राव : येथील पूर्वाभिमुखी गणेश मंदिरामध्ये गणेश जयंतीच्या निमित्ताने ‘श्री गणेश पुराण कथासार’ पारायणास प्रारंभ झाला. ध्वजपूजन, गणेशपूजन गोपाळ कुलकर्णी यांच्या पौरोहित्याखाली करण्यात आले. याप्रसंगी विजयानंद माने, संतोष चव्हाण, प्रकाश टाकळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

----------------------

शिरोळमध्ये गतिरोधक बसविण्याची मागणी

जयसिंगपूर : जयसिंगपूर ते शिरोळ मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. जिरगे पेट्रोल पंप, दत्त कारखाना प्रवेशद्वार, मध्यवर्ती शासकीय इमारत, श्री पद्माराजे विद्यालय याठिकाणी गतिरोधक बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहतुकीची वारंवार कोंडी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

----------------------

बाजारात मोबाइल चोरीच्या घटना

जयसिंगपूर : शहरातील रविवारच्या आठवडा बाजारात मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले आहे. बाजारात येणाऱ्या नागरिकांचे मोबाइल हातोहात लांबविले जात आहेत. त्यामुळे जयसिंगपूर पोलिसांनी अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.

Web Title: Short story