शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उपवर तरुणी व पालकांचे प्रबोधन होण्यासाठी पदवीधर मित्र माणिक पाटील चुयेकर यांनी ‘शेतकरी नवरा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उपवर तरुणी व पालकांचे प्रबोधन होण्यासाठी पदवीधर मित्र माणिक पाटील चुयेकर यांनी ‘शेतकरी नवरा हवा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याचे उद्घाटन कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते मठावर झाले. हे अभियान जिल्हाभर राबविले जाणार आहे.

या उपक्रमाची माहिती देताना चुयेकर म्हणाले, शेती व्यवसाय त्रासदायक आणि कमी उत्पन्न देणारा असल्याचा समज समाजात पसरला आहे. यामुळे आज ‘शेतकरी नवरा नकोच’ ही भावना मोठ्या प्रमाणावर वाढीस लागली आहेत. यातून वेगळीच सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे. लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्याही वाढीस लागल्या आहेत. शेती याेग्य प्रकारे कसल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. हाच धागा पकडून हा उपक्रम राबवला असल्याचे चुयेकर यांनी सांगितले.

..........................................

कचरावेचकांना मनरेगांतर्गत काम देण्याची ‘अवनि’ची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य सरकारने मनरेगा योजनेची व्याप्ती वाढवू् कचरावेचकांचा त्यात समावेश करून त्यांना हक्काचा रोजगार द्यावा, अशी मागणी अवनि संस्थेतर्फे अनुराधा भोसले यांनी ग्रामविकास हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मुश्रीफ यांनी या संदर्भात संबंधित विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कचरावेचकांना न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.

मंत्री मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे कचरावेचकांचा रोजगार संपला असून महिला भंगार गोळा करण्यास धजावत नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कचरा वर्गीकरण हा विषय ‘मनरेगा’मध्ये समाविष्ट केल्यास त्यांना हक्काचा रोजगार मिळू शकेल. संगीता लाखे, रेखा सोनटक्के, मीना सोनटक्के, सविता सोनटक्के, अंजली लाखे, जैनुद्दीन पन्हाळकर, सतीश पाटील उपस्थित होते.