Kolhapur: कार चालकाकडून १६ वर्षांपूर्वी घेतले ३ लाखांत सोनोग्राफी मशीन; युवराज पाटीलचे काळे कारनामे चौकशीतून समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:04 IST2026-03-26T19:03:41+5:302026-03-26T19:04:06+5:30

कारवाई होऊनही मशीन सापडले नव्हते, परवानाधारक डॉक्टर सदर बाजारातील

Shocking information comes to light after the action taken against the Gender Detection and Abortion Center The interrogation of Dr Yuvraj Patil | Kolhapur: कार चालकाकडून १६ वर्षांपूर्वी घेतले ३ लाखांत सोनोग्राफी मशीन; युवराज पाटीलचे काळे कारनामे चौकशीतून समोर 

Kolhapur: कार चालकाकडून १६ वर्षांपूर्वी घेतले ३ लाखांत सोनोग्राफी मशीन; युवराज पाटीलचे काळे कारनामे चौकशीतून समोर 

कोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री येथे श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्रावर झालेल्या कारवाईनंतर डॉ. युवराज पाटील याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. जप्त केलेले पोर्टेबल सोनोग्राफी मशीन त्याने १६ वर्षांपूर्वी त्याच्याच कार चालकाकडून तीन लाखांत खरेदी केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे त्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल होऊनही मशीन पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दरम्यान, त्याचा मित्र डॉ. उत्तमकुमार सरदेसाई हा सदर बाजार येथील राहणारा असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

वैद्यकीय सेवेचा परवाना निलंबित असतानाही मित्राच्या परवान्यावर हॉस्पिटल थाटून गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा अड्डा चालवणाऱ्या युवराज पाटीलचे अनेक काळे कारनामे चौकशीतून समोर येत आहेत. तो गेल्या १६ वर्षांपासून गर्भात कळ्या खुडण्याचा गोरखधंदा करीत आहे. २०१० मध्ये त्याने स्वत:च्या कारचालकाकडून तीन लाखांत सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली. चालकाने ते मशीन कर्नाटकातून आणले होतो. सध्या तो चालक हयात नाही. दोन वर्षांपूर्वी करवीर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातही त्याच चालकाने मशीन पुरविल्याची माहिती समोर आली होती.

विशेष म्हणजे २०१० नंतर डॉ. पाटील याच्यावर अवैध गर्भलिंग निदानचे दोन गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी त्याला अटक करून हॉस्पिटल आणि घराची झडती घेतली होती. त्या कारवाईत पोलिसांना मशीन सापडले नाही. त्यामुळे त्यावेळी तपास काय झाला? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

साथीदार डॉक्टर पळाला

कोल्हापुरातील सदर बाजार परिसरात राहणारा डॉ. उत्तमकुमार सरदेसाई याच्या वैद्यकीय परवान्यावर श्रद्धा हॉस्पिटल सुरू होते. त्याने युवराज पाटील याला परवाना कसा दिला? त्याला पाटील याच्या गोरखधंद्याची माहिती होती काय? गर्भलिंग निदानातील कमिशन त्याला मिळत होते काय? याची चौकशी केली जाणार आहे. अटक टाळण्यासाठी तो घर सोडून पळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डेटा रिकव्हरी सुरू

हॉस्पिटलमधून जप्त केलेले आठ मोबाइल, दोन टॅब आणि संगणकातील डेटा रिकव्हर करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. यातून काही धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच पाटील आणि एजंट शिंदे या दोघांचे कॉल डिटेल्स तपासण्याचे काम सुरू आहे. यातून काही एजंट आणि डॉक्टरांनी नावे समोर येऊ शकतात, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी दिली.

वैद्यकीय अधीक्षकांनी काय केले?

वैद्यकीय अधीक्षकांच्या समितीकडून त्यांच्या परिसरातील रुग्णालयांची दर तीन महिन्यांनी तपासणी केली जाते. गेल्या दोन-तीन वर्षांत बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमधील संशयास्पद कारभाराची माहिती समितीला कशी काय मिळाली नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title : कोल्हापुर: ड्राइवर से खरीदी सोनोग्राफी मशीन, अवैध गर्भपात रैकेट का पर्दाफाश।

Web Summary : डॉ. युवराज पाटिल ने 16 साल पहले अपने ड्राइवर से सोनोग्राफी मशीन खरीदी थी। वह अवैध गर्भपात के लिए जांच के दायरे में है। पुलिस उसके साथी डॉ. उत्तमकुमार सरदेसाई की तलाश कर रही है। जब्त उपकरणों से डेटा रिकवरी जारी है।

Web Title : Kolhapur: Sonography machine bought from driver exposed illegal abortion racket.

Web Summary : Dr. Yuvraj Patil bought a sonography machine from his driver 16 years ago. He is under investigation for illegal abortions. Police are searching for his accomplice, Dr. Uttamkumar Sardesai. Data recovery from seized devices is underway.