लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : लेसर शौचा झगमगाट आणि ध्वनी यंत्रणेच्या दणदणाटाबरोबरच पारंपरिक बाजात छत्रपती शिवाजी महारार्जाच्या जयंतीनिमित्त रविवारी शहरात जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भव्य अश्वारूढ शिवछत्रपती, छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासह छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ यांच्यासह मावळ्यांचा वेष परिधान करून घोड्यांवर स्वार झालेल्या मावळे यामुळे शहरात जणू शिवशाहीच अवतरली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, संयुक्त मंगळवार पेठ, सोमवार पेठ येथील फाइटर क्लब, घिसाड गल्ली, संयुक्त कंजारभाट समाज, संयुक्त पांचगाव, शाहूपुरी येथील मराठा वारियर्स, व्हीनस कॉर्नर, संयुक्त गंजीमाळ तालीम, तटाकडील तालीम, संयुक्त कनाननगर, खंडोबा तालीम, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम अशा शहरातील विविध मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या मिरवणुकीचा प्रारंभमिरजकर तिकटी चौकात आमदार राजेश क्षीरसागर आणि मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होऊन मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी नगरसेवक आश्कीन आजरेकर, आदिल फरास, अशोक पोवार, अनिकेत घोटणे, चंद्रकांत भोसले, स्वप्नील पार्दै, वसंत मुळीक, माणिक मंडलिक, रमेश मोरे उपस्थित होते. मिरवणुकीचे संयोजन उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष पोवार, श्रीधर पाटील, संदीप चौगुले, अभिषेक तितुर, ऋतुराज साळुंखे, साहिल डाकवे, मंदार खोत, आदींनी केले.
लक्षवेधी देखाव्यांतून मांडले सामाजिक प्रश्न
या मिरवणुकीत कोल्हापुरातही मठ दरबारात, भोंदूबाजी जोरात, यावर पोलिसांबरोबर जनतेनेही लोकांचे परिवर्तन केले पाहिजे हा सजीव देखावा लक्षवेधी ठरला. कोल्हापुरातील तालीम मंडळांचा वापर फक्त उत्सव जयंतीसाठी नको, युवकांच्या आरोग्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी पण झाला पाहिजे, आई अंबाबाईची बदनामी करू नका या देखाव्याद्वारे व्यावसायिक व्यापाऱ्यांकडून पर्यटकांची होणारी लूट, पोलिसांचे दुर्लक्ष, अंबाबाई मंदिरातील गैरसोयी इत्यादी प्रश्नही मांडले होते.
रिक्षांद्वारे फलकातून सामाजिक संदेश
भटकी कुत्री, जनावरांचा वावर, शाहू मिलचे पुनर्जीवन करा, हद्दवाढ, वाढती अतिक्रमणे, पर्यावरणासाठी स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनीचा वापर करा, शिवसमाधीचा शोध लावून पहिल्यांदा शिवजयंती साजरी करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन असे सामाजिक संदेश देणारे आणि मार्मिक भाष्य करणारे दहा रिक्षांवर लावलेले मिरवणुकीतील फलक लक्ष वेधून घेत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक, संयुक्त मंगळवार पेठ, सोमवार पेठ येथील फाइटर क्लब, शाहूपुरी वैचील मराठा वारियर्स, व्हिनस कॉर्नर, तटाकडील तालीम, खंडोबा तालीम, आदी मिरवणूकीत सहभागी झाले होते.
हलगी घुमक्याच्या ठेक्यात लेझीम पथकांचा फेर
संयुक्त मंगळवार पेठेच्या मिरवणुकीत १४ फुटी भव्य अश्वारूढ शिवछत्रपतींचा पुतळा, त्याच्यापुढे अतिशय दिमाखात चाललेले शिवछत्रपतींच घोडदळ, हलगी घुमक्याच्या ठेक्यात लेझीम पथकांनी फेर धरला होता. मिरवणुकीत युवकांचे हलगी घुमक्याच्या तालावर लेझीम पथक, सजीव देखावे, ध्वनिक्षेपकावर शिवगीते अशा पारंपरिक नव्या आणि जुन्या बाज पहायला मिळत होता.
Web Summary : Kolhapur celebrated Shivaji Maharaj Jayanti with vibrant processions featuring traditional music, equestrian displays, and social commentary. Tableaus highlighted issues like superstition and environmental concerns. The event showcased community spirit and historical pride.
Web Summary : कोल्हापुर में शिवाजी महाराज जयंती पारंपरिक संगीत, घुड़सवारी प्रदर्शन और सामाजिक टिप्पणियों के साथ मनाई गई। झांकियों में अंधविश्वास और पर्यावरण संबंधी मुद्दों पर प्रकाश डाला गया। इस आयोजन ने सामुदायिक भावना और ऐतिहासिक गौरव का प्रदर्शन किया।