तात्यासाहेब कोरे व आनंदराव जाधव (पैलवान आण्णा) यांनी वारणा समूहात एकदिलाने काम केले. तोच वारसा संचालक बाळासाहेब जाधव व माजी मंत्री आमदार विनय कोरे यांनी वारणा समूहात चालविला. बाळासाहेब जाधव हे गेल्या २० वर्षांपासून वारणा साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत होते. शेती, सहकार, राजकीय, अध्यात्मिक, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. बहिरेवाडीचे माजी सरपंच आणि पन्हाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र जाधव, प्रख्यात धन्वंतरी डॉ. सुनील जाधव यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. बहिरेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. विनय कोरे, वारणा बँकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे, विश्वेश कोरे यांच्यासह वारणा उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, शुक्रवारी (दि. २९) बहिरेवाडी येथे आहे..
फोटो - शिवाजीराव उर्फ बाळासाहेब जाधव