शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी बँकेचा परवाना रद्द होणार ?

By admin | Updated: June 15, 2014 01:53 IST

गडहिंग्लजमध्ये खळबळ : ‘आरबीआय’ची कारवाई सुरू

गडहिंग्लज : गडहिंग्लज येथील श्री शिवाजी सहकारी बँकेचा बँकिंग व्यवसायाचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. परवान्याला पाचव्यांदा मिळालेली मुदतवाढ २४ आॅक्टोबर २०१४ पर्यंत असतानाही कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळेच रिझर्व्ह बँकेने बँकिंगचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. परवाना रद्द झाल्यास बँक अवसायनात निघाणार असून ठेवीदार व कर्मचारी उघड्यावर पडणार आहेत. त्यामुळे गडहिंग्लजसह जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दुपारी बँक बचावासाठी हितचिंतकांची बैठक सुरू असतानाच मुंबईहून आलेल्या ‘आरबीआय’च्या दोन अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत बँकेत ठाण मांडून आवश्यक कागदपत्रे व ताळेबंद आदींची माहिती घेतली. त्यांच्याकडून दुजोरा मिळाल्यामुळे परवाना रद्दची कारवाई अटळ आहे. सुरुवातीला बहुजन समाजाची बँक म्हणून नावलौकिक झालेली ही बँक संचालकांचा गैरकारभार व गैरव्यस्थापनामुळे अडचणीत आली. बेकायदेशीर कर्जवाटपामुळे कर्जवसुलीवर परिणाम झाल्यामुळे मुदत संपलेल्या ठेवी वेळेवर परत देता आल्या नाहीत. ठेवीदार कृती समितीच्या आंदोलनामुळे बँकेवर प्रशासक आले. दरम्यान, ठेवीदार व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रशासकांनी बँकेच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न केले. मात्र, काही कर्मचारी न्यायालयात गेल्यामुळे त्यात व्यत्यय आला. त्याचाच फायदा घेऊन काही मंडळींकडून बँक वाचविण्याच्या नावाखाली विलीनीकरणालाच खो घालण्याचा प्रयत्न झाला. माजी संचालक, प्रशासक व कर्मचारी यांच्यातील विसंवादामुळे विलीनीकरणाची प्रक्रियादेखील लांबत गेली. त्यामुळे बँकिंग परवान्याला मुदतवाढ मिळूनही बँकेच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळेच रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. परवाना रद्द झाल्यास बँक अवसायनात निघाल्यास ठेवीदार व कर्मचारी वाऱ्यावर पडणार आहेत. त्यामुळे ‘आरबीआय’च्या कारवाईकडे गडहिंग्लजसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवाजी बँकेच्या हितचिंतकांची एक व्यापक बैठक झाली. बँकेचा परवाना आणि बँक वाचवण्यासाठी सर्व ताकदीनिशी अजूनही प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अमर चव्हाण होते. बैठकीस नगरसेवक किरण कदम, नितीन देसाई, अरुण कलाल, तानाजीराव मोहिते, बचाराम मोहिते, जयसिंग चव्हाण, बाबासाहेब पाटील, बाळेश नाईक, शशिकांत चोथे आदींसह माजी संचालक व हितचिंतक उपस्थित होते. (प्रतिनिधी)