शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची होणार झाडाझडती

By Admin | Updated: May 22, 2014 01:10 IST2014-05-22T01:08:13+5:302014-05-22T01:10:11+5:30

पराभवाचे चिंतन : वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ आज कोल्हापुरात

Shiv Sena's office bearers will grow Jharkhand | शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची होणार झाडाझडती

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची होणार झाडाझडती

 कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील झालेल्या पराभवाबाबत चिंतन करण्यासाठी उद्या (दि. २२) शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ कोल्हापुरात येत आहे. त्यामध्ये कोल्हापूर मतदारसंघातील शिवसेना पदाधिकार्‍यांची झाडाझडती केली जाणार असून हा अहवाल पक्षप्रमुखांना पाठविला जाणार आहे. संजय मंडलिक यांच्या पराभवानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आत्मचिंतन करण्याऐवजी एकमेकांवर चिखलफेक सुरू केल्याने पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. पराभवास नेमके कोण-कोण जबाबदार आहेत, याचा आढावा शिष्टमंडळ घेणार आहे. शिवसेनेचे संपर्कनेते आमदार दिवाकर रावते, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार अनिल देसाई हे कोल्हापुरात येत आहेत. एका हॉटेलात सकाळी अकरा वाजता हातकणंगले मतदारसंघातील पदाधिकार्‍यांशी चर्चा केली जाणार आहे. दुपारी एक वाजता करवीर, कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पदाधिकार्‍यांची चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता चंदगड, राधानगरी-भुदरगड व कागल मतदारसंघांतील पदाधिकार्‍यांची झाडाझडती होणार आहे. या चर्चेचा अहवाल उद्धव ठाकरे यांना दिला जाईल.

Web Title: Shiv Sena's office bearers will grow Jharkhand