शिरोलीत तरुणाचा मित्रांनीच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:34+5:302021-02-05T06:54:34+5:30

आरोपींना शिरोली आणि गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरकोळ वादातून झालेल्या या खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोरांनी पलायन केलं. या घटनेची ...

Shiroli youth was murdered by his friends | शिरोलीत तरुणाचा मित्रांनीच केला खून

शिरोलीत तरुणाचा मित्रांनीच केला खून

आरोपींना शिरोली आणि गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

किरकोळ वादातून झालेल्या या खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोरांनी पलायन केलं. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिसांत झाली आहे. शिरोली आणि गांधीनगर परिसरात राहणाऱ्या तरुणांनी बुधवारी दुपारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत शिरोली येथील पीर बालेचाॅंदसो दर्ग्याच्या पाठीमागे पार्टीचे नियोजन केले होते. शिरोली दर्गाहनजीक पाच ते सहाजणांनी एकत्र येऊन बिर्याणीचे जेवण केले होते. नशेत असलेल्या समीर नदाफ, योगेश साखरे यांनी अमित राठोड याला दारूची बाटली आणायला सांगितले. अमितने नकार दिला म्हणून मद्य व गांजा प्राशन करीत असलेल्या नदाफ आणि योगेश या दोघांनी अमितच्या पोटात धारदार शस्त्राने भोकसले. यावेळी अमित रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला.

हल्ल्यानंतर घाबरलेल्या मित्रांनी जेवण तिथेच टाकून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या अमित नाईक याला आदित्य पाटील आणि शुभम गव्हाणे यांनी दुचाकीवरून केसवानी रुग्णालयात दाखल केले. या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनान शिरोली पोलिसांना कल्पना दिली. तसेच रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी असलेल्या अमित नाईक याला रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी संशयितांना गांधीनगर येथून ताब्यात घेतले आहे. या घाटनेची माहिती मिळताच शिरोली आणि गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

चौकट...

दररोजच पार्टीचे नियोजन...

या दर्ग्याच्या परिसरात असणाऱ्या शेतात रोजच टवाळ गँग गांजा आणि दारू पार्टीसाठी येत असतात. वादविवादाचे प्रसंग रोजच घडत असून, येथील शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.

फोटो ओळी.

०३

अमित राठोड

...............

Web Title: Shiroli youth was murdered by his friends