शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: PSI'ने फसवून तीन लग्न केली, पत्नीने तक्रार दिली; पोलिस प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:07 IST

शिरोळ : स्वत:च्या पत्नीला फसवून आणखी दोन लग्न करणाऱ्या शिरोळ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक इम्रान बाबाजी मुल्ला यांना जिल्हा ...

शिरोळ : स्वत:च्या पत्नीला फसवून आणखी दोन लग्न करणाऱ्या शिरोळ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक इम्रान बाबाजी मुल्ला यांना जिल्हा पोलिस प्रमुखांनी सेवेतून निलंबित केले आहे. मुल्ला यांच्याविरोधात त्यांच्याच पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली. मुल्ला यांनी तीनवेळा लग्न केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली.पोलिस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांचा आफरीन मुल्ला यांच्याशी २०१९ च्या दरम्यान विवाह झाला होता. गोंदिया येथे सेवा बजावत असताना आफरीन यांच्यासोबत मुल्ला यांचा सातत्याने वाद होत होता. यावेळी गोंदियातील केशारी पोलिस ठाण्यात आफरीन यांनी शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद झाला होता.त्यावेळी इम्रान यांच्यावर सेवेतून निलंबनाची कारवाई झाली होती. त्याचदरम्यान पत्नी आफरीन यांनी पाठपुरावा केल्यानंतर २०१५ साली पोलिस निरीक्षक मुल्ला यांचे पहिले लग्न झाले असल्याची माहिती मिळाली. कायदेशीररित्या घटस्फोट झाल्याची माहिती न देता इम्रान यांनी आफरीन यांच्याशी विवाह केल्याचे देखील समोर आले. दरम्यान २३ जून २०२४ रोजी पोलिस निरीक्षक मुल्ला यांनी तिसरे लग्न केल्याची माहिती मिळाल्यानंतर कराड पोलिस ठाण्यात आफरीन यांनी तक्रार दिली. कारवाई होत नसल्याने माहिती अधिकारात त्यांनी पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला. इम्रान यांच्याकडे चौकशीनंतर माझं तिसरं लग्न झालेलं नसून सुहानाकुमारी ही माझी मैत्रीण आहे, असा खुलासा केला होता. दरम्यान, मुस्लीम कायद्यानुसार तिहेरी तलाकाची कायदेशीर नोटीस पाठवून लग्न केल्याची माहिती देखील चौकशीदरम्यान इम्रान यांनी दिली आहे. त्यामुळे तिसरे लग्न मी कायदेशीररित्या केल्याची माहिती देखील त्यांनी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. इम्रान मुल्ला आणि आफरीन मुल्ला यांच्यातील तलाक प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे इम्रान यांनी आतापर्यंत तीनवेळा लग्न केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाल्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने  त्यांना सेवेतून निलंबित केल्याचा आदेश काढला आहे.  पोलिस उपनिरीक्षक मुल्ला यांना निलंबित केल्याची माहिती शिरोळचे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न