शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेतात घाम गाळत अक्षताताई एमबीबीएस

By admin | Updated: March 8, 2017 00:12 IST

परिस्थितीनं शहाणपणं दिलं आणि शिकण्यावाचून पर्याय नाही हे कळलं.

वीरकुमार पाटील -- कोल्हापूर शिक्षणासाठी हातात खोरं, खुरपं घेऊन शेतात राबणाऱ्या जिद्दी अक्षता गंभीर चौगुले हिने नुकतीच ‘एमबीबीएस’ची पदवी घेतली असून ‘एमडी’ होण्यासाठी तिचा अभ्यास सुरू आहे.इचलकरंजी शहराजवळील माणकापूर (ता. चिक्कोडी) या सीमाभागातील जन्मगावात तिने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आई म्हणजे काय? हे समजण्याच्या वयातच जन्मदात्रीनं तिचा हात सोडला आणि वडिलांबरोबच आजी, चुलते, चुलती यांनी तिचं संगोपन केलं. पाठीवर एक भाऊ. परिस्थितीच्या चटक्यामुळं शहाणपण आलेल्या अक्षतानं सातवीतच हातात खुरपं घेतलं. घरच्या शेतात झेंडू, भाजीपाला पिकवून तो रस्त्याकडेला बसून तिने विकला. व ते ही शाळा व रोजचा अभ्यास सांभाळून. दहावीत अक्षताला ८९ टक्के गुण मिळाले. त्यानंतर इचलकरंजीतील एएससी महाविद्यालयात तिने सायन्सला प्रवेश घेतला. कॉलेजची वेळ, अभ्यास सांभाळत तिनं शेतातली कामं सुरूच ठेवली. बारावीला ती ८३ टक्क्यांने पास झाली. बारावीनंतर मेडिकलला जायची ऐपत नव्हती; पण लातूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला. ज्या दिवशी परीक्षा होती त्याच्या दोन दिवस अगोदर वडिलांचं निधन झालं. दु:ख बाजूला सारलं आणि परीक्षा दिली. ७१ टक्केगुण मिळाले. अक्षता सध्या मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करीत आहे. परिस्थितीनं शहाणपणं दिलं आणि शिकण्यावाचून पर्याय नाही हे कळलं. एमबीबीएसमुळं थोडा पैसा मिळणार असल्याने माझ्यासह भावाचं पुढचं शिक्षण पूर्ण करणार आहे. येणाऱ्या अडचणींवर मात करायचीच हे ठरविलं तर जगात अशक्य असं काहीच नाही, असं मला वाटतं.- अक्षता चौगुले.