Kolhapur: आयसीयूमध्ये मुलीची छेड काढणारा शाहूपुरीचा पोलिस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:55 IST2025-04-05T11:54:50+5:302025-04-05T11:55:18+5:30
कोल्हापूर : एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल १५ वर्षांच्या मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणातील शाहूपुरीतील पोलिस चेतन दिलीप घाटगे याला ...

Kolhapur: आयसीयूमध्ये मुलीची छेड काढणारा शाहूपुरीचा पोलिस निलंबित
कोल्हापूर : एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल १५ वर्षांच्या मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणातील शाहूपुरीतील पोलिस चेतन दिलीप घाटगे याला शुक्रवारी जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांनी निलंबित केले.
पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात आयसीयू विभागात बुधवारी दाखल करण्यात आले होते. तिचा जबाब घेण्यासाठी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास घाटगे रुग्णालयात गेला होता.
यावेळी चेतन याने त्या मुलीची छेड काढली. लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले, असे तक्रारीत म्हटले आहे. गुरुवारी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तो फरार आहे. या गंभीर कृत्याची दखल घेऊन त्याला निलंबित करण्यात आले आहे.