शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कोल्हापुरात फुटबॉल सामन्यांचा थरार सुरु; शिवाजी मंडळाचा एकतर्फी विजय, झुंजार क्लबची पीटीएम ब संघावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 13:08 IST

झुंजार क्लबच्या विकी रजपूतने हंगामातील पहिली हॅटट्रिक केली

कोल्हापूर : बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ संघाने शुक्रवारी येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू झालेल्या शाहू छत्रपती केएसए स्पर्धेत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर २ -० असा एकतर्फी विजय मिळवून यंदाच्या हंगामातील स्पर्धेला शानदार प्रारंभ केला. त्यापूर्वी झुंजार क्लबच्या विकी रजपूतने हंगामातील पहिली हॅटट्रिक केली. त्याच्या जोरावर संघाने पीटीएम ब संघावर ३ -२ असा विजय मिळवला.श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी यांच्यातील सामन्यात ‘शिवाजी’च्या खेळाडूंनी प्रथमपासूनच खेळावर पकड ठेवली. संकेत साळोखे याच्या फ्री किकवर योगेश कदमने दहाव्या मिनिटाला हेडद्वारे गोल नोंदवला. या गोलनंतर ‘शिवाजी’चे खेळाडू आक्रमक झाले. करण चव्हाण-बंदरे, इंद्रजित चौगुले, संकेत साळोखे, संदेश कासार, योगेश कदम यांनी खोलवर चढाया केल्या.प्रत्युत्तरादाखल ‘फुलेवाडी’च्या सोविक घोषाल, सिद्धार्थ पाटील, रोहित जाधव, इम्रान खान, निरंजन कामते, ऋतुराज संकपाळ यांनी प्रयत्न केले. पूर्वार्धात १-० अशी गोलसंख्या होती. उत्तरार्धात ‘फुलेवाडी’चा रोहित जाधवचा डाव्या पायाचा फटका गोल पोस्टच्या जवळून गेला. सोविक गोशालचा फटका ‘शिवाजी’चा गोलकीपर मयुरेश चौगुलेने पंच करून बाहेर काढला. ४७ व्या मिनिटाला ‘शिवाजी’च्या करण चव्हाण-बंदरे यांच्या पासवर संकेत साळोखे याने गोल नोंदवत २-० अशी भक्कम आघाडी घेतली. ‘फुलेवाडी’च्या खेळाडूंकडून गोलसाठी शर्थीची धडपड केली.दरम्यान, दुपारच्या सत्रात झुंजार क्लब संघाने पीटीएम ब संघावर ३-२ अशी मात केली. पीटीएम ‘ब’चा युनूस पठाणने १५ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला पहिला गुण मिळवून दिला, ३९ व्या मिनिटाला श्रेयस मुळीकने गोल केला. पूर्वार्धाच्या वाढीव वेळेत ‘झुंजार’चा खेळाडू विकी रजपूत याने ४० व्या मिनिटाला सलग दोन गोल नोंदवून सामना बरोबरीत आणला. पूर्वार्धातील गोल संख्या २-२ अशी होती. उत्तरार्धात त्याने ७९ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत संघाला विजय मिळवून दिला. हंगामातील आणि स्पर्धेतील त्याच्या या पहिल्याच हॅटट्रिकला प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष करत प्रोत्साहन दिले...यांच्यावर ‘रेड कार्ड’ची कारवाईगतवर्षीच्या हंगामात ‘रेड कार्ड’ची कारवाई झाल्यामुळे शिवाजीच्या सुयश हांडे, सुमित जाधव, रोहन आडनाईक या तीन खेळाडूंना यंदाच्या पहिल्या सामन्यात खेळता आले नाही. या खेळाडूंनी मैदानात टी शर्ट काढून जल्लोष केल्याने ही कारवाई केली.

आजचे सामनेदुपारी १:३० वाजता : बीजीएम स्पोर्टस् विरुद्ध सोल्जर ग्रुपदुपारी ४:०० वाजता : दिलबहार तालीम विरुद्ध संयुक्त जुना बुधवार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल