शहीद भगतसिंग सामाजिक, राजकीय क्रांतीचे ज्वालामुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST2021-05-31T04:17:58+5:302021-05-31T04:17:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहीद भगतसिंग हे सामाजिक व राजकीय विचारांचे ज्वालामुखी होते. वयाच्या २४ व्या वर्षी शहीद ...

Shaheed Bhagat Singh is a volcano of social and political revolution | शहीद भगतसिंग सामाजिक, राजकीय क्रांतीचे ज्वालामुखी

शहीद भगतसिंग सामाजिक, राजकीय क्रांतीचे ज्वालामुखी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहीद भगतसिंग हे सामाजिक व राजकीय विचारांचे ज्वालामुखी होते. वयाच्या २४ व्या वर्षी शहीद झालेले भगतसिंग म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद होते. मार्क्सचा शास्त्रीय समाजवाद यांचा प्रगल्भ मानबिंदू होता. मार्क्स-लेनिन यांचे विचार यातून भगतसिंगांची वैचारिक समाजवादी भूमिका तयार झाली होती. म्हणूनच ते सार्वकालिक सुसंगत असे विचारवंत ठरले, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ऑल इंडिया यूथ फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन कोल्हापूरच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ऑनलाईन बौद्धिक शिबिरात 'शहीद भगतसिंग एक विचार' या विषयावर ते बोलत होते.

कुलकर्णी यांनी भगतसिंग यांची संपूर्ण विचारधारा आणि तिच्या समकालीन संदर्भ याची सविस्तर मांडणी केली. जावेद तांबोळी यांनी स्वागत केले. शिबिराचे आयोजन धीरज कठारे, आरती रेडेकर, राम करे यांनी केले. प्रशांत आंबी यांनी आभार मानले.

Web Title: Shaheed Bhagat Singh is a volcano of social and political revolution