शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

सावलीने सोडली पन्नास सेकंदांसाठी सोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST

कोरोनाच्या प्रसारामुळे हौशी कोल्हापूरकर खगोलप्रेमींनी आपापल्या घराजवळ आणि गच्चीवर भरदुपारी सावली गायब झाल्याचा वैज्ञानिक चमत्कार ...

कोरोनाच्या प्रसारामुळे हौशी कोल्हापूरकर खगोलप्रेमींनी आपापल्या घराजवळ आणि गच्चीवर भरदुपारी सावली गायब झाल्याचा वैज्ञानिक चमत्कार अनुभवला. कोल्हापूर शहरातील अनेक खगोलप्रेमींनी गुरुवारी दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंदापासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत जवळपास ५० सेकंद सावली गायब झाल्याची प्रचिती घेतली. यामध्ये खगोलप्रेमी डॉ. राजेंद्र भस्मे, किरण गवळी, डॉ. अविराज जत्राटकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशाेधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांचा समावेश आहे. डॉ. व्हटकर यांनी आपल्या निवासस्थानी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.२९ मिनिटांनी २३.५ ते - २३.५ या अक्षांशामध्ये या शून्य सावलीच्या क्षणांचा अनुभव घेतला. यावेळी सावली बरोबर त्यांच्या पायात होती, असे त्यांनी सांगितले. ह्या वेळेला सूर्य बरोबर माथ्यावर होता आणि त्याची किरणेही लंबरूप पडली होती.

पृथ्वी ही कर्कवृत्तावरून बरोबर तीन महिन्यांने वसंत संपात बिंदूपाशी येते. या दिवशी १२ तासांची रात्र आणि १२ तासांचा दिवस असतो. या दिवशी सूर्याची किरणे विषुववृत्तावर पडतात. त्यामुळे विषुववृत्तावर कुठेही उभा राहिले तरी सावली काही काळासाठी नाहीशी होते. तीन महिन्यांनी मकरवृत्तावर, तीन महिन्यांनी परत विषुववृत्तावर आणि परत तीन महिन्यांनी कर्कवृत्तावर शून्य सावली दिसते; मात्र कर्कवृत्त, विषुववृत्त या स्थानांमध्ये सूर्याची किरणे ही ज्यावेळी १६.७४ डिग्री नॉर्थ या रेखावृत्तावर पडतील या ठिकाणी असणाऱ्या जागांवर काही सेकंदाकरिता सावली अदृश्य झाली.

चौकट

नांदणीत सावलवडे यांनी केला वेगळा प्रयोग

शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील खगोल अभ्यासक प्रा. भारत सावलवडे यांनी काही वेगळे प्रयोग केले. त्यांना आपल्या घराच्या गच्चीत प्रत्यक्ष शून्य सावली कशी पाहायची याचा प्रयोग १२.२१ वाजल्यापासून १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत अनुभवला. त्यांनी पृष्ठभागावर क्षितिजसमांतर पातळीवर मोबाईल, होकायंत्र, काचेचा ग्लास, झाकण, दोन काचेच्या ग्लासवर एक आडवी काच आणि त्यावरील दोन्ही ग्लासच्या मध्यभागी नाणे ठेवून हा प्रयोग केला. १२ वाजून २१ मिनिटांपासून सावली हळूहळू दूर जात होती. जवळजवळ सात मिनिटे सावलवडे यांनी निरीक्षणे नोंदविली. मात्र, सूर्य दक्षिणेलाच राहिल्याने सावली पूर्णपणे गायब झालेली नव्हती.

‘शून्य सावली’चा आज पुन्हा अनुभव घेता येणार

महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी विविध दिवशी ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येणार आहे. कोल्हापुरात आज, शुक्रवारी पुन्हा दि. ७ मे रोजी ‘शून्य सावली’ दिवसाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रा. भारत सावलवडे यांनी दिली.

------------------------------------------------------

फोटो : 06052021-Kol-Zero Shadow Day

06052021-Kol-Zero Shadow Day 1

(बातमीदार : संदीप आडनाईक)