कोल्हापूर रेल्वे स्थानकातील व्हीआयपी कार्यालयात स्वच्छता कर्मचारी महिलेवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:26 IST2025-05-06T12:25:53+5:302025-05-06T12:26:45+5:30
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे स्वच्छतेचे काम करणाऱ्या एका महिलेवर ठेकेदाराने (सुपरवायझर) अतिप्रसंग केल्याचा प्रकार १३ एप्रिलला ...

कोल्हापूर रेल्वे स्थानकातील व्हीआयपी कार्यालयात स्वच्छता कर्मचारी महिलेवर लैंगिक अत्याचार
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे स्वच्छतेचे काम करणाऱ्या एका महिलेवर ठेकेदाराने (सुपरवायझर) अतिप्रसंग केल्याचा प्रकार १३ एप्रिलला घडला. याप्रकरणी गणेश हंकारे (रा. कोल्हापूर) याच्यावर मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्यात सोमवारी कलम ६४ (१) ३५१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
१३ एप्रिलला कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील व्हीआयपी कार्यालयात पीडित महिला सकाळी १० वाजता स्वच्छता करण्यासाठी गेली असता हंकारे याने पाठोपाठ मागे येत पीडितेचे तोंड दाबून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पीडितेने आरडाओरडा केला असता आरोपीने कोणाला काही सांगायचे नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने कोल्हापूर लोहमार्ग दूरक्षेत्र येथे लेखी तक्रार दिल्यानंतर हंकारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.