शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सर्व्हर डाऊनने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 5:36 PM

शिवाजी विद्यापीठाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी.सह विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पात्रता अर्ज भरताना मनस्ताप होत आहे. एक अर्ज भरण्यास साडेतीन ते चार तास लागत आहेत.

ठळक मुद्देसर्व्हर डाऊनने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप शिवाजी विद्यापीठाचा पात्रता अर्ज भरण्यात अडचण : मुदतवाढीची मागणी

 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी.सह विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पात्रता अर्ज भरताना मनस्ताप होत आहे. एक अर्ज भरण्यास साडेतीन ते चार तास लागत आहेत.कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या प्रथम वर्षातील ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहेत, त्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पात्रतेचा अर्ज ऑनलाईन नोंदणी करावयाचा आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. त्यानुसार बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बीबीए., बीसीए, आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरले जात आहेत. त्यासाठी दि. १९ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हरची गती अत्यंत संथ आहे. त्यासह वारंवार सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास विलंब लागत आहे. एका अर्जासाठी चार तासांचा वेळ जात आहे. या संकेतस्थळावर मदतीचा पर्यायही उपलब्ध नाही. ड्रॉपडाऊन मेनूही कार्यरत होत नाही. या तांत्रिक अडचणीकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष असल्याची तक्रार विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.

ऑनलाईन प्रक्रिया १० ते १५ मिनिटांमध्ये पूर्ण होणे आवश्यक आहे. पण, या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. कोरोनामुळे अधिकतर विद्यार्थी हे स्मार्टफोनद्वारेच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागांतील इंटरनेट उपलब्धतेची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे विद्यापीठाने सर्व्हरची गती वाढवावी अथवा अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी स्वतंत्रपणे मुदत द्यावी, अशी सूचना काही पालकांनी केली आहे.

दरम्यान, याबाबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, तांत्रिक अडचण असल्यास ती दूर केली जाईल. विद्यार्थीहित लक्षात घेऊन हे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विद्यापीठाच्या प्रशासनाचा विचार सुरू आहे.अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांचे अर्ज नाहीतविद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाची महाविद्यालयांमधील प्रक्रिया पूर्ण केली आहे. पात्रता अर्ज भरण्याची सूचना महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना केली आहे. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ग अद्याप भरत नसल्याने विद्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये येत नाहीत. त्यामुळे अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांनी पात्रता अर्ज भरलेले नाहीत. ही स्थिती आणि सर्व्हरबाबतची तांत्रिक अडचण लक्षात घेता, हे अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी महाविद्यालयांकडून होत आहे. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी