शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

Ashwini Bidre: बिद्रे यांच्या खुनाबद्दल शिक्षा दिली; परंतु मृत्यू दाखला मिळेना, गोरे कुटुंबीयांना मनस्ताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:05 IST

न्याय देणार नसाल तर इच्छामरण द्या

कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खूनप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावून दहा महिने उलटल्यानंतरही बिद्रे यांच्या मृत्यूचा दाखला नातेवाईकांना मिळालेला नाही. परिणामी, मृत्यूपश्चातचे लाभ अद्याप नातेवाईकांना मिळालेले नाहीत. त्यामुळे न्याय देणार नसाल तर इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी बिद्रे यांचे पती राजू गोरे (रा. हातकणंगले) यांनी पत्राद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याकडे केली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

ठाणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे एप्रिल २०१६ पासून बेपत्ता होत्या. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने साथीदारांच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे तपासातून उघडकीस आले होते. त्यानुसार उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे पनवेल सत्र न्यायालयाने कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. 

त्यानंतर बिद्रे यांच्या मृत्यूपश्चात दिले जाणारे लाभ मिळावेत, यासाठी त्यांचे पती गोरे यांनी हातकणंगले ग्रामपंचायत, पनवेल महापालिका, मीरा-भाईंदर महापालिका आणि नवी मुंबई सहायक आयुक्तांकडे मृत्यू दाखल्याची मागणी केली होती. मात्र, शासकीय यंत्रणांनी अद्याप मृत्यूचा दाखला दिलेला नाही. मृत्यूचा दाखला नसल्याने त्यांच्या नातेवाईकांना विमा, फंड, ग्रॅच्युईटी आणि इतर शासकीय लाभ मिळालेले नाहीत.

सर्किट बेंचकडून दखल

मृत्यूचा दाखला देण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये तक्रार अर्ज दिला आहे. सर्किट बेंचने याची दखल घेतली असून, लवकरच कार्यवाही करू, असे पत्राद्वारे कळवले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ashwini Bidre Murder: No Death Certificate, Family Seeks Euthanasia

Web Summary : Despite convictions in Ashwini Bidre's murder, her family still lacks a death certificate. This prevents them from accessing benefits, leading her husband to request euthanasia from the President and Supreme Court.