ज्येष्ठ उद्योजक विश्वासराव जुगदार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST2021-06-02T04:20:14+5:302021-06-02T04:20:14+5:30

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ उद्योजक आणि स्वाती इंडस्ट्रीज व स्वाती कन्स्ट्रक्शन उद्योग समूहाचे प्रमुख विश्वासराव महिपती जुगदार तथा ...

Senior businessman Vishwasrao Jugdar passes away | ज्येष्ठ उद्योजक विश्वासराव जुगदार यांचे निधन

ज्येष्ठ उद्योजक विश्वासराव जुगदार यांचे निधन

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ उद्योजक आणि स्वाती इंडस्ट्रीज व स्वाती कन्स्ट्रक्शन उद्योग समूहाचे प्रमुख विश्वासराव महिपती जुगदार तथा बाबजी ( वय ७९, रा. रविवारपेठ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर ) यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कोल्हापूर येथे ४७ वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या ट्रॅक्टर ट्रेलर उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी उद्योग सुरू केला. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने त्यांचा ज्येष्ठ व यशस्वी उद्योजक पुरस्कार देऊन गौरव केला होता. माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे ते मित्र होते. गरजूंच्या मदतीला ते नेहमी धावून जात. सामाजिक उपक्रमात ते सहभागी होत असत.

(०१०६२०२१-कोल-विश्वासराव जुगदार-निधन)

Web Title: Senior businessman Vishwasrao Jugdar passes away