शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपींची मालमत्ता जप्त करणार

By admin | Updated: April 7, 2017 01:08 IST

दाभोलकर, पानसरे हत्या; गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यातील फरारी आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास, या प्रकरणातील फरार आरोपी आणि सनातन संस्थेवर कारवाई करण्याबाबतची लक्षवेधी सूचना गुरुवारी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री केसरकर म्हणाले की, दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोघा फरार आरोपींचा तपास सुरू आहे. तसेच सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव २०११ सालीच केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. फरार आरोपींवर पाच लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले असून रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे. तसेच फरारी आरोपी लवकर पकडले जावेत, यासाठी त्यांची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया प्रस्तावित आहे.दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत न्यायालयाने असमाधान व्यक्त केले आहे. यावर सरकारची काय भूमिका आहे, २०१४ सालीच हा तपास सीबीआयकडे दिलेला असताना खटला का चालत नाही, असे प्रश्न नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केले. शिवाय, आजकाल कोणालाही धमक्या येत आहेत असेही त्या म्हणाल्या. यावर समाजात कोणाला धमक्या येत असतील, तर त्यांची नावे सांगितल्यावर संरक्षण देऊ तसेच सनातनचे संजीव पुनाळेकर यांची वैयक्तिकरित्या चौकशी करता येईल की नाही, हे कायद्याच्या चौकटीतून पडताळून घ्यावे लागेल, असे केसरकर यांनी सांगितले.