शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

निर्जन स्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST

कोल्हापूर : शहर व उपनगरांत अनेक निर्जन स्थळे गुन्हेगारांचे अड्डे बनल्याचे चित्र दिसून येत आहे. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर अशा ...

कोल्हापूर : शहर व उपनगरांत अनेक निर्जन स्थळे गुन्हेगारांचे अड्डे बनल्याचे चित्र दिसून येत आहे. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर अशा निर्जन स्थळांचा शोध घेऊन त्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले. कोल्हापूर शहर व परिसरात सुमारे ६१ निर्जन स्थळे निश्चित करून पोलिसांनी करडी नजर ठेवली. जिल्ह्यातील निर्जन स्थळावर लक्ष ठेवण्यासाठी ६ निर्भया पथके नेमली. पोलीस ठाण्याचा दैनंदिन कार्यभार सांभाळत निर्जन स्थळावर गस्त घालताना निर्भया पथकाला कमालीची कसरत करावी लागते. त्यामुळे अशा स्थळांकडे त्यांची फिरती मंदावल्याचे दिसते.

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी तसेच निर्जन स्थळावरील गुन्हेगारी कारवाई कमी व्हाव्यात, या उद्देशाने निर्भया पथके सक्रिय आहे. कोरोना महामारीत निर्भया पथकांच्या कामाला काहीसा ब्रेक लागला. आता ही पथके पुन्हा सक्रिय झाली. जिल्ह्यात कोल्हापूर, करवीर, इचलकरंजी, जयसिंगपूर, शाहुवाडी, गडहिंग्लज अशी पोलीस उपविभागीय कार्यालयानुसार सहा पथके सक्रिय आहेत.

जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना

वर्ष : बलात्कार - विनयभंग

२०१९ : १२८ - २३७

२०२० : ११५ - ३१८

२०२१ (ऑगस्ट) : ८२ - १७१

निर्भय पथकाची कारवाई

वर्ष : गुन्हे दाखल - समुपदेशन - प्रतिबंधात्मक करवाई - वाहनांवर कारवाई

२०१९ : ०९ - २४,१४१ - १५,६६८ - ६,८४६

२०२० : ०६ - २,८८२ - १,३५१ - ५०७

२०२१ : ०४ - ९२८ - ६७६ - ३८२

शहरात ६१ निर्जन स्थळांची यादी

कोल्हापूर शहरात सर्व उद्याने, मंदिरे तसेच चित्रनगरी, रंकाळा पदपथ, शिवाजी विद्यापीठ परिसर, पुईखडी, चंबुखडी, शिये टोल नाका परिसर, आयसोलेशन परिसर आदी सुमारे ६१ निर्जन स्थळे पोलीसांनी निश्चीत करुन त्यावर लक्ष केंद्रित केले.

ही ठिकाणे धोक्याचीच!

चित्रनगरी : निर्जन, महामार्गानजीक व शहरापासून दूरवर हा परिसर असल्याने येथे गुन्हेगारांचा नेहमीच वावर दिसतो. विशेषत: हा भाग कमी लोकवस्तीचा असल्याने दिवसाही निर्जन असल्याने ते प्रेमी युगुलांचे आश्रयस्थान मानले जाते. याचाच हे गुन्हेगार गैरफायदा उठवून गैरकृत्ये करतात.

आयसोलेशन परिसर : आयसोलेशन हॉस्पिटलच्या पिछाडीस रिंगरोड तसेच गर्द झाडी आहे. लोकवस्ती विरळ असल्याने हा गैरकृत्याचा अड्डाच बनला आहे. रात्रीच्या वेळी हा परिसर अंधारमय व शहरालगतच असल्याने येथे मोठ्या प्रमणावर गैरकृत्ये घडतात.

पुईखडी टेकडी : राधानगरीकडे जाणारा हा अंधारमय मार्ग व टेकडीचा परिसर असल्याने लोकवस्ती अद्याप विरळच आहे. त्यामुळे या परिसरात प्रेमीयुगुलांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत.

पोलीस चुकूनच दिसतात...

शहर व परिसरातील निर्जन स्थळे निश्चित आहेत. एका पथकात एक महिला उपनिरीक्षक, दोन महिला व दोन पुरुष पोलीस अशी पाच जणांची पथकांची संख्या आहे, प्रत्येक पथकास एक चारचाकी वाहन दिले. कोरोनामुळे या पथकाची गस्त निर्जन स्थळावर कमी झाली आहे. त्यामुळे पोलीस चुकूनच त्या स्थळावर गस्त घालताना दिसतात.