शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

भामट्यांच्या शोधासाठी आंध्र प्रदेशला पथक रवाना

By admin | Updated: August 25, 2015 00:25 IST

एसएमएसद्वारे फसवणूक प्रकरण : दिवसभर गुंतवणूकदारांची पोलीस ठाण्यात वर्दळ

कोल्हापूर : मोबाईल एसएमएसद्वारे कंपन्यांची आॅनलाईन जाहिरात करण्यासाठी दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या शोधासाठी सोमवारी आंध्र प्रदेशला पथक रवाना झाले. संशयित आरोपी संदीप रेड्डी, वेलकृष्णन, चैतन्य, कुमार पांडे (सर्व रा. सेंट मेरी रोड, पेराम्बूर, चेन्नई) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून त्यांचे वास्तव आंध्र प्रदेशमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, गुंतविलेल्या पैशांचे पुरावे सादर करण्यासाठी सोमवारी दिवसभर गुंतवणूकदारांची शाहूपुरी पोलीस ठाण्यात वर्दळ सुरू होती. गुंतवणूकदारांची संख्या दीड हजारपेक्षा जास्त असल्याने याठिकाणी तक्रारी घेण्यासाठी स्वतंत्र पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. संदीप रेड्डी, वेलकृष्णन, चैतन्य, कुमार पांडे या चौघांनी तीन महिन्यांपूर्वी न्यू शाहूपुरी परिसरातील शारदा चेंबर्समध्ये ‘व्हीजन मीडिया आयटी सोल्युशन फर्म’ नावाने कंपनी सुरू केली होती. जगभरातील १९ कंपन्यांचे आॅनलाईन जाहिरातीचे टेंडर घेतल्याचे सांगून त्यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकमधील गुंतवणूकदारांना १५ दिवसांत दामदुप्पट पैसे मिळविण्याची भुरळ घालून त्यांच्याकडून एसएमएसच्या नावाखाली पैसे गोळा करून शनिवारी रात्री कार्यालयाला टाळे ठोकून पलायन केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदार बाबासाहेब नारायण निवळे (वय ३५, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले) यांनी आपली पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी या चौघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, सोमवारी फसवणूक झालेल्या शंभरपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी पैसे जमा केलेल्या पावत्या पोलिसांकडे जमा केल्या. यावेळी पाच हजारपासून २५ लाख रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये काही एजन्सीधारकांचा समावेश आहे. फसवणूक प्रकरणात महाविद्यालयीन तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आॅनलाईन एसएमएस पाठवण्याचे काम कोणत्याही नेट कॅफेमधून करता येत असल्याने अनेकांनी त्यामध्ये पैसे गुंतविले. सुरुवातीस तीन ते चार हप्त्यांमध्ये दामदुप्पट पैसे मिळू लागल्याने पैशाच्या हव्यासापोटी गुंतवणूक केल्याचे तक्रारदारांनी सांगितले.