शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

करवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल-स्वच्छताविषयी जागृती : देशातील १२ पर्वकालामध्ये भोगावती नदीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:50 AM

कोल्हापूर : देशात १२ ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळा, महापर्वकालांची नेहमी चर्चा होते. मात्र, या महापर्वकालात करवीरातील विशालतीर्थ भोगावती नदी शिंगणापूरचा समावेश असून गुरूने वृश्चिक

इंदुमती गणेश, ।कोल्हापूर : देशात १२ ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळा, महापर्वकालांची नेहमी चर्चा होते. मात्र, या महापर्वकालात करवीरातील विशालतीर्थ भोगावती नदी शिंगणापूरचा समावेश असून गुरूने वृश्चिक राशीत प्रवेश केल्यानंतर होणारा वृश्चिक महापर्वकाल १२ आॅक्टोबरपासून करवीरक्षेत्री होत आहे. पंचांगकर्त्यांनी यंदाच्या पंचांगात त्याचा समावेश करून त्यावर मोहोर उमटविली आहे.

यंदा मात्र, ‘नमामी पंचगंगा’ या संस्थेच्या वतीने महापर्वकालाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.गुरूने विशिष्ट राशीत प्रवेश केल्यानंतर देशातील बारा ठिकाणी कुंभमेळा, महापर्वकाल सुरू होतो. गुरूचा प्रत्येक राशीत वर्षभर मुक्काम असल्याने हा कालावधी वर्षाचा असतो. गुरूने सिंह राशीत प्रवेश केला की नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा, कुंभ राशीत प्रवेश केला की हरिद्वारमध्ये कुंभमेळा, कन्या राशीत प्रवेश केला की नृसिंहवाडीत कन्यागत महापर्वकाल होतो. या काळात स्थानिक नदीमध्ये गंगा नदीचे अवतरण होते. ती वर्षभर या नदीच्या सान्निध्यात राहते आणि भक्त तिच्या भेटीला येतात, अशी संकल्पना आहे. निसर्ग, नदी, पर्यावरण आणि मानवाला जोडणारी सांस्कृतिक साखळी म्हणून महापर्वकालाचे महत्त्व आहे.

महापर्वकालामध्ये करवीरातील भोगावती नदीचा समावेश असल्याने शंकराचार्यांसह धार्मिक बाबींचे ज्ञान असलेल्या व्यक्ती या कालावधीत तेथे जाऊन स्नान करतात. हीच भोगावती नदी पुढे पंचगंगेला मिळते. नदीची स्वच्छता, तिचे महत्त्व पोहोचविण्यासाठी ‘नमामी पंचगंगा’ नावाची संस्था स्थापन करून , त्या संस्थेतर्फे या महापर्वकालाचे आयोजन केले आहे. त्यासाठी सर्व पीठांचे शंकराचार्य, धर्मपीठांचे गुरू, आखाडे यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.दोन भागांत महापर्वकालधार्मिक ग्रंथ व यंदाच्या वर्षीच्या मराठी पंचांगांमध्ये नकाशासहित महापर्वकालात भोगावतीचे स्थान विशद करण्यात आले आहे.यंदा ११ आॅक्टोबरला सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी गुरू वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. तेव्हापासून शिंगणापूर येथे महापर्वकाल असतो.१२ आॅक्टोबरला येथील हटकेश्वराच्या मंगल स्नान महापर्वाची सुरुवात होईल.हा महापर्वकाल ११ आॅक्टोबर ते २९ मार्च २०१९ व २३ एप्रिल ते ५ नोव्हेंबर २०१९ या दोन कालावधीत होत आहे. 

देशातील १२ महापर्वकालांमध्ये करवीरातील भोगावती व पर्यायाने पंचगंगा नदीचा समावेश ही धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही खूूप मोठी गोष्ट आहे. अज्ञानामुळे आजवर येथे महापर्वकाल साजरा झाला नाही. यंदा मात्र त्याचे आयोजन करून नदीचे महत्त्व आणि तिची स्वच्छता यांबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे.- उमाकांत राणिंगा(‘नमामी पंचगंगा’ उपक्रमाचे मार्गदर्शक)

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूरriverनदी