शुल्क मिळत नसल्याने कोरोचीतील शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:04+5:302021-02-05T06:56:04+5:30

सन २००३ मध्ये कोरोची येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची विनाअनुदानित तत्त्वावरील ही शाळा सुरू झाली. सध्या या शाळेत कोरोची, ...

Schools closed in Korochi due to non-receipt of fees | शुल्क मिळत नसल्याने कोरोचीतील शाळा बंद

शुल्क मिळत नसल्याने कोरोचीतील शाळा बंद

सन २००३ मध्ये कोरोची येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची विनाअनुदानित तत्त्वावरील ही शाळा सुरू झाली. सध्या या शाळेत कोरोची, इचलकरंजी, तारदाळ, आदी परिसरातील सुमारे पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १६ शिक्षक आणि ३० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाच्या कालावधीत शुल्क आकारणीसाठी पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये या शासन आदेशाचे पालन या शाळेने केले. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा व्यवस्थापनाने पालकांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश शुल्क भरण्याची विनंती केली. मात्र, कोरोनामुळे आर्थिक बिघडल्याचे कारण देत बहुतांश पालकांनी अद्याप शुल्क भरलेले नाही. शासनाचे अनुदान नसल्याने विद्यार्थ्यांच्या शुल्कातून जमा होणाऱ्या रकमेतून शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन, अन्य शैक्षणिक खर्च शाळा व्यवस्थापनाला करावा लागतो. यावर्षी शुल्क जमा झाले नसल्याने वेतन, अन्य खर्च करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर संबंधित शाळा बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

चौकट

विद्यार्थ्यांचे नुकसान नाही

कोरोनामुळे आधीच बहुतांश विद्यार्थ्यांचे शुल्क मिळालेले नाही. त्याच काही पालकांच्यावतीने मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्ष नीलेश भालेकर यांनी शाळेच्या शुल्कामध्ये ८० टक्के सवलत द्यावी, या मागणीचे निवेदन शाळा प्रशासनाला दिले. मात्र, आर्थिक खर्चाचा डोलारा सांभाळणे शक्य नसल्याने शाळेच्या संस्थापिका डॉ. विजया मोहन यांनी ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेचे संचालक कपिल केसरकर यांनी दिली. सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी यंदाचे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर शाळा बंद केली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांचे दाखले दिले जातील, असे केसरकर यांनी सांगितले.

Web Title: Schools closed in Korochi due to non-receipt of fees