शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

यादववाडीत शाळाच आपल्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

उचगाव : कोरोना संसर्गामुळे दीड वर्षे शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणास मर्यादा येत असल्याने, यादववाडी विद्या मंदिर प्राथमिक शाळेतील ...

उचगाव : कोरोना संसर्गामुळे दीड वर्षे शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणास मर्यादा येत असल्याने, यादववाडी विद्या मंदिर प्राथमिक शाळेतील शिक्षिका पूनम भोपळे यांनी शाळाच आपल्या दारी व विद्यार्थ्यांच्या घरीच बुक बँक हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. पूनम भोपळे यांनी स्व:खर्चातून विद्यार्थ्यांच्या घरातील भिंतीचा वापर करून, सर्व विषयांचे शैक्षणिक तक्ते व अध्ययन साहित्य पुरविले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वाचनात व लेखनात लक्षणीय वाढ होत आहे. विद्यार्थी टीव्ही किंवा मोबाइलमध्ये गुंतून न राहता, अध्ययन करू लागले आहेत. भिंतीवरील तक्त्याच्या निरीक्षणाद्वारे चिकित्सकपणे अभ्यास करत आहेत. यामुळे सृजशीलता व एकाग्रता वाढून अभ्यासविषयी आवड निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, भोपळे यांनी सोबतच ‘घरोघरी फिरते वाचनालय’ हा उपक्रमही सुरू केला आहे. प्रत्येक मुलाच्या घरी प्रत्येकी पाच पुस्तके देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यानी वाचलेली पुस्तके दुसऱ्या विद्यार्थ्याला देऊन, त्याने वाचलेली पुस्तके आपण घेऊन पुस्तकांची देवाणघेवाण करत आहेत. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सचिन देशमुख, सचिन गाताडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव दरुर, दत्तात्रय तोरस्कर व प्रभारी मुख्याध्यापिका मंगल माळी यांच्या हस्ते करण्यात आले.