Kolhapur News: एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचे अपहरण, तरुणास चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:57 IST2026-03-10T17:56:58+5:302026-03-10T17:57:13+5:30

माझ्यासोबत लग्न कर. नाहीतर तुझ्या वडिलांचा आणि भावाचा खून करणार, अशी दमदाटी करीत त्याने पीडित मुलीस मारहाण केली

School girl kidnapped due to one sided love in Kolhapur | Kolhapur News: एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचे अपहरण, तरुणास चोप

Kolhapur News: एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचे अपहरण, तरुणास चोप

कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून १४ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करून विनयभंग केल्याप्रकरणी सिद्धार्थ राजू कोळेकर (वय २१, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. ९) गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, शेंडा पार्क येथे मुलीच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केल्याने जखमी झालेल्या कोळेकरला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी मुलीच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ कोळेकर हा सोमवारी सकाळी पीडित मुलीस खासबाग येथून जबरदस्तीने आपल्या दुचाकीवरून घेऊन गेला होता. शेंडा पार्क परिसरात नेऊन त्याने तिला धमकाविले.

माझ्यासोबत लग्न कर. नाहीतर तुझ्या वडिलांचा आणि भावाचा खून करणार, अशी दमदाटी करीत त्याने पीडित मुलीस मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग केला. काही वेळातच पीडित मुलीच्या नातेवाइकांनी कोळेकर याचा शोध घेऊन त्याला बेदम मारहाण केली. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.

Web Title : कोल्हापुर: एकतरफा प्यार में स्कूली छात्रा का अपहरण, युवक की पिटाई

Web Summary : कोल्हापुर में 14 वर्षीय स्कूली छात्रा का एकतरफा प्यार में अपहरण और छेड़छाड़। आरोपी सिद्धार्थ कोलेकर (21) ने शादी से इनकार पर परिवार को जान से मारने की धमकी दी। लड़की के रिश्तेदारों ने कोलेकर को पीटा। पुलिस ने मामले दर्ज किए।

Web Title : Kolhapur: Schoolgirl Kidnapped Over Unrequited Love, Youth Beaten

Web Summary : A 14-year-old Kolhapur schoolgirl was kidnapped and molested by Siddharth Kolekar (21). He threatened to kill her family if she refused marriage. The girl's relatives found Kolekar and beat him severely. Police have registered cases against Kolekar and the relatives.