शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांना स्कूल बस

By admin | Updated: March 10, 2017 23:52 IST

‘लोकमत’च्या वृत्तानंतर निधी : शिक्षण विभागाकडून सव्वा लाखाचा निधी; उदगाव-चिंचवाडमधील मुले

संतोष बामणे --जयसिंगपूरमहाराष्ट्र शासनाच्या ‘सारे शिकूया पुढे जाऊया’ या धोरणाप्रमाणे एकही मूल निरक्षर राहू नये, यासाठी गेल्या ११ वर्षांपासून शिरोळ तालुक्यातील उदगाव, चिंचवाड येथे विटभट्टीवर काम करणाऱ्या कर्नाटकातील कामगाराच्या मुलांना शिक्षणाची सोय करून दिली आहे. मात्र, विटभट्टीच्या ठिकाणी शिक्षण न घेता शाळेतच शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांना स्कूलबसमधून ने-आण करण्यासाठी जिल्हा शिक्षण विभागाकडून एक लाख १९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तालुक्यात मोलमजुरीसाठी दुष्काळी भाग व कर्नाटकातून मजूर येतात व त्यांची मुले शिक्षणापासून दूर राहू नयेत, यासाठी उदगाव येथील देसाई विद्यामंदिर, कन्या विद्यामंदिर, उदगाव टेक्निकल हायस्कूल व चिंचवाड कुमार विद्यामंदिर व कन्या विद्यामंदिरच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना विटभट्टी परिसरातच कन्नड भाषेतील शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी विटभट्टीच्या शाळेत भेट दिली होती. यावेळी या मुलांना शाळेतच शिक्षण मिळावे, यासाठी स्कूल बसची सोय उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले होते. यासाठी शिक्षण विभागाकडून एक लाख १९ हजारांचा निधी दिला आहे. या कामगारांच्या मुलांची संख्या चिंचवाड येथे ३५, तर उदगाव येथे ४२ विद्यार्थी आहेत. गेल्या ११ वर्षांत ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कानडी बाह्य शाळेतून शिक्षण घेतले आहे. विद्यार्थ्यांना जेवण, पुस्तके, वह्या, पेन, कपडे याबरोबरच आरोग्य सुविधाही दिल्या आहेत. सुरगोंडा पाटील, सतीश पाटील, मुख्याध्यापक विजय कोळी, शोभा कोळी, मुख्याध्यापक रावसाहेब इंगळे, विस्तार अधिकारी वांद्रे, विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांनी पुढाकार घेतला आहे. ‘लोकमत’चे कौतुकउदगाव येथील सर्व शाळांनी एकत्रित येऊन कानडी शिक्षणापासून वंचित मुलांना कन्नड शिक्षणाची सोय करून दिली आहे. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी शाळेत भेट दिली होती. यावेळी या मुलांना शाळेत शिक्षण मिळण्यासाठी स्कूल बससाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले होते. सध्या एक लाख १९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने सर्वत्र ‘लोकमत’चे कौतुक होत आहे. या शाळेत सोय : उदगाव-चिंचवाड येथील असलेल्या विटभट्टीवरील मुलांना उदगाव येथील देसाई विद्यामंदिर-७ विद्यार्थी, कन्या विद्यामंदिर-४ विद्यार्थी, उदगाव टेक्निकल हायस्कूल - ७ विद्यार्थी, चिंचवाड कुमार व कन्या विद्यामंदिर - ७ विद्यार्थी व जयसिंगपूर येथील ज्ञानसागर कन्या विद्यालयात १०४ विद्यार्थ्यांची स्कूलबसमधून जाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विटभट्टीवरील मुले आता स्कूल बसमधून शाळेत जाणार आहेत.