शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

करवीर पंचायत समिती घेणार स्कॉलरशिप सराव परीक्षा

By admin | Updated: December 11, 2014 00:03 IST

पाच हजार विद्यार्थी परीक्षा देणार : शिक्षणाच्या गुणवत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी उपक्रम; परीक्षेची तयारी सुरू

कसबा बावडा : शिक्षणाच्या गुणवत्तेचा झेंडा सर्वत्र फडकविण्यासाठी आणि जिल्ह्यात तालुक्याचे आदर्श नाव होण्यासाठी करवीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने इयत्ता चौथी आणि सातवीची जानेवारी व फेब्रुवारीमध्ये स्कॉलरशिपची सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहे. सुमारे पाच हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, शिक्षक शनिवारी आणि रविवारी जादा तास घेत आहेत.मार्च २०१५ मध्ये चौथी व सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये आपल्या तालुक्याने नाव करावे यासाठी अनेक तालुके धडपडताना दिसत आहेत. यात करवीर तालुक्याने मात्र काहीशी आघाडी घेतल्याचे दिसते. दैनंदिन शाळांच्या वेळाव्यतिरिक्त सकाळी ७ ते १० व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत स्कॉलर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे जादा तास घेण्यात येऊ लागले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या पाल्यांशी याबाबत शिक्षक चर्चा करीत आहेत. अभ्यास कसा करायचा, पेपर कसा सोडवायचा, मुलांचे खेळ, त्यांचा आहार, आदींबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात येऊ लागले आहे.तालुक्यात १८५ शाळा आहेत. या शाळांमध्ये १२२६ शिक्षक आहेत, तर विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३० हजारांच्या घरात आहे. मार्च २०१५ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी चौथीच्या स्कॉलरशिपसाठी तीन हजार विद्यार्थी, तर सातवीच्या स्कॉलरशिपसाठी दोन हजार विद्यार्थी बसणार आहेत. यंदा तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांच्या बरोबरोबरच पालकांनाही आपल्या मुलाने स्कॉलरशिप परीक्षेला बसावे, असे वाटत आहे. त्यामुळे मुलांचा अभ्यास घरी घेताना पालक दिसत आहेत.सुजलाम्-सुफलाम् करवीर तालुका शैक्षणिकदृष्ट्या नेहमीच आघाडीवर राहावा यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव तसेच समितीच्या सभापती पूनम महेश जाधव व समितीचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)स्कॉलरशिप परीक्षेला प्रतिसादतालुक्यातील चौथी आणि सातवीची एकूण पाच हजार मुले जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणारी सराव स्कॉलरशिप परीक्षा देणार आहेत. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची तयारी दिसून येणार आहे. या सराव परीक्षेमुळे जास्तीत जास्त मुले मुख्य परीक्षा पास होण्यास मदत होणार आहे.- आर. जी. चौगले, गटशिक्षण अधिकारी, करवीर पंचायत समिती.