शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळचे ग्रामीण रूग्णालय ‘आजारी’

By admin | Updated: October 14, 2015 00:13 IST

खासदार, आमदारांच्या गावातील रूग्णालयाची अवस्था : चांगल्या आरोग्य सुविधांचा घट कधी बसणार

संदीप बावचे - शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव, रिक्त पदे व भोंगळ कारभार यामुळे हे रुग्णालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी परिस्थिती बनली आहे. पूर्वीचे प्राथमिक आरोग्य केंद्र होते ते बरे होते, अशी भावना रुग्णांतून व्यक्त होऊ लागली आहे. ज्या अपेक्षेने हे रुग्णालय सुरू करण्यात आले, ती अपेक्षाच फोल ठरत आहे. खासदार, आमदार यांच्या गावातील रुग्णालयाची अशी अवस्था असल्याने तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा फोल ठरत आहेत. शिरोळ गावचा वाढता विस्तार पाहता आणि आरोग्याची सुविधा जास्तीत जास्त रुग्णांना मिळावी, या हेतूने माजी आरोग्यमंत्री कै. दिग्विजय खानविलकर यांच्या प्रयत्नातून शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळाली होती. २००२ सालापासून येथे ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग अशा जागा भरण्यात आल्या. मात्र, गेल्या १२ वर्षांतील रुग्णालयाचा कारभार पाहता सामान्य जनतेच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. वैद्यकीय सेवेबाबत डॉक्टर उपलब्ध असतात, नसतात अशा रुग्णांच्या तक्रारी आहेत. ३० बेडचे रुग्णालय असून याठिकाणी २५ जणांचा कर्मचारीवर्ग आहे. लाखो रुपये रुग्णालयावर शासन खर्च करत आहे. मात्र, भोंगळ कारभारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिरोळ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि कामकाजात तत्काळ सुधारणा करावी, तसेच कार्यालयीन कामकाजाबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. याची दखल घेऊन कोल्हापूर आरोग्य उपसंचालकांनी दरमहा अहवाल सादर करावा, असे आदेश शिरोळ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत. दुपारी वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या आहेत. यामुळे हे रुग्णालय सोयीचे कमी, गैरसोयीचेच अधिक बनले आहे. निवासस्थानाअभावी कुचंबणा होत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासस्थान उपलब्ध झाले आहेत. तब्बल एका तपानंतर निवासस्थानाचा प्रश्न निकालात निघाला असला तरी कारणे पुढे करून वैद्यकीय अधिकारी याठिकाणी राहण्यास इच्छुक नसल्याचे कर्मचारीवर्गातून बोलले जात आहे. ( समाप्त)शिरोळ : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षशिरोळसह परिसरातील रूग्णांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात या हेतूने शिरोळ ग्रामीण रूग्णालय सुरू करण्यात आले. लोकप्रतिनिधींचे या रूग्णालयाकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच येणाऱ्या काळात हे रूग्णालय बंद पडते की काय, अशी अवस्था असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या खासदार, आमदारांच्या गावातीलच आरोग्यसेवा कोलमडली असल्यामुळे याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘लोकमत’चे अभिनंदन‘लोकमत’ने शासकीय आरोग्य यंत्रणा या भागातून आरोग्य सेवेतील त्रुटींवर प्रकाशझोत टाकला. लोकमतच्या पाठपुराव्याचे सामान्य जनतेतून अभिनंदन होत आहे. असाच पाठपुरावा करून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी केला जाणार आहे.स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून येथील प्रसूतीगृह बंद पडले आहे. नवीन स्त्रीरोगतज्ज्ञाची नियुक्ती झाली असल्याचे रूग्णालयातून सांगण्यात आले. मात्र, ते रूजू झाले नसल्याचे सांगण्यात आले.