शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

संजय घाटगे शिवबंधनात अडकणार

By admin | Updated: August 19, 2014 00:39 IST

उद्धव ठाकरे गुरुवारी दौऱ्यावर :हमीदवाडा, सरुड येथे मेळाव्यास प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच गुरुवारी (दि. २१) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते सेना प्रवेशाच्या तयारीत आहेत. त्याची सुरुवात माजी आमदार संजय घाटगे यांनी केली आहे. त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. इतरांचा निर्णय महायुतीच्या जागावाटपाच्या निर्णयावर अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकीची काही दिवसांतच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षांत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. महायुतीतही चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. याच धामधुमीतून वेळ काढत उद्धव ठाकरे यांनी खास कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा आखला आहे. त्यांच्या दौऱ्यात हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व शेतकरी मेळावा होणार आहे. या ठिकाणी माजी आमदार संजय घाटगे शिवबंधनात अडकून शिवसेनेचा ‘भगवा’ खांद्यावर घेणार आहेत. त्याचबरोबरआसपासच्या विधानसभा मतदारसंघातील इतर नेतेही या ठिकाणी ‘भगवा’ हातात घेण्याच्या तयारीत आहेत; परंतु त्यांचे घोडे महायुतीच्या जागा वाटपाच्या निर्णयामुळे अडकले आहे. याचवेळी भुदरगडचे प्रकाश आबिटकर सेना प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमाला शिवसेना नेते आ. रामदास कदम, आ. सुभाष देसाई, खा. संजय राऊत, आ. डॉ. नीलम गोऱ्हे, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते आ. दिवाकर रावते, संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.त्याचबरोबर दुपारी २ वाजता सरुड (ता. शाहूवाडी) येथील शिव-शाहू महाविद्यालयाच्या पटांगणावर होणाऱ्या पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांतील शिवसैनिकांच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत खा. राजू शेट्टी यांच्या प्रचारात नसणारे व काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप होत असलेल्या सत्यजित पाटील-सरुडकरांच्या मेळाव्याचे ठाकरे यांनी निमंत्रण स्वीकारुन आता नव्या वादाला तोंड फोडले आहे. इथून मागे सेनेचे व्यासपीठ कटाक्षाने टाळणारे व महायुतीच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणाऱ्या सरुडकरांना फक्त आमदारकीपुरतीच सेना पाहिजे का? असा सवाल महायुतीच्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)