आजरा तालुक्यातील साळगाव बंधारा पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 18:43 IST2020-07-07T18:42:04+5:302020-07-07T18:43:04+5:30
संततधार पडणाऱ्या पावसाने आजरा तालुक्यातील साळगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे.

साळगाव बंधाऱ्यावर आलेले पाणी.
ठळक मुद्देआजरा तालुक्यातील साळगाव बंधारा पाण्याखालीबॅरीकेटस लावून रस्ता वाहतुकीस बंद
सदाशिव मोरे
आजरा -संततधार पडणाऱ्या पावसाने आजरा तालुक्यातील साळगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे.
बंधाऱ्यावर पाणी आल्याने पोलीस खात्याने दोन्ही बाजूने बॅरीकेटस लावून रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. पाण्यामुळे साळगाव, पेरणोली, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, विनायकवाडीसह या मार्गावरील वाहतूक सोहाळे, सुतगिरणीमार्गे सुरु करणेत आली आहे.