साकेत राजे- मंडलिक आघाडीचा धुव्वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:26+5:302021-01-20T04:25:26+5:30
साके : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या साके येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजे - मंडलिक आघाडीचा धुव्वा उडाला, तर मुश्रीफ-संजयबाबा ...

साकेत राजे- मंडलिक आघाडीचा धुव्वा
साके : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या साके येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजे - मंडलिक आघाडीचा धुव्वा उडाला, तर मुश्रीफ-संजयबाबा आघाडीने सर्वच ११ जागेवर निर्विवाद यश मिळवले. ११ जागेसाठी ३६ उमेदवार रिंगणात होते.
साके येथील ग्रामपंचायत निवडणूक ही तिरंगी होताना साम, दाम, दंड या सर्व नीतीचा वापर झाला. गावात हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाची मिळालेली समर्थ साथ या आघाडीला एकतर्फी विजयापर्यंत घेऊन गेली. या उलट विरोधी समरजितसिंह घाटगे आणि मंडलिक या गटांचा सुरुवातीचा मेळ लागण्याला बराच कालावधी गेला. अपक्षांनी घेतलेली मते आणि झालेली बंडखोरी ही मंडलिक- राजे आघाडीला मारक ठरली. त्यामुळेच राजे-मंडलिक आघाडी व अपक्षांतील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.
मुश्रीफ गटाचे नेतृत्व तालुका संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब तुरंबे, चंद्रकांत परसू निऊंगरे, अशोक सातुशे, नाना कांबळे, ज्ञानदेव पाटील, मारुती निऊंगरे, सी. बी. कांबळे, बापूसो कागले, बाबूराव डॅाक्टर, विजय जाधव, राजू शेंडे, तानाजी हरेल, मारुती शेंडे, डॅा. तानाजी निऊंगरे, राजू नायकवडी, उत्तम कांबळे, तर संजयबाबा गटाचे नेतृत्व नानासो कांबळे, ज्ञानदेव पाटील, अशोक पा. पाटील, किरण पाटील, चंद्रकांत काळू निऊंगरे, डी. एस. निऊंगरे यांनी केले.