शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हप्ते पाडून देतो, कारखाना चालवा

By admin | Updated: November 22, 2015 00:36 IST

गडहिंग्लज कारखाना : शहापूरकरांना मुश्रीफांचे आव्हान

गडहिंग्लज : दोन वर्षे तोटा होऊनदेखील ‘ब्रीसक्’ कंपनीने कारखाना व्यवस्थित चालविला आहे. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत कारखाना चालवायला देण्यात आला, याबाबत आत्मचिंतन करण्याऐवजी माझ्यावर बेछूट आरोप करणाऱ्या शहापूरकरांनी गडहिंग्लज कारखाना चालवायला घ्यावा, असे आव्हान आमदार हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकरांना दिले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या संपर्क मोहिमेत सभासदांना कारखाना वाचविण्याचे आवाहन करतानाच शहापूरकरांनी आमदार मुश्रीफांवर टीकेची झोड उठविली आहे. त्यास मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. मुश्रीफ म्हणाले, उसाची बिले वेळेवर न दिल्यामुळे संचालक मंडळावर फौजदारी झाली. तोडणी-ओढणीच्या बिलासह कामगारांचा पगारदेखील थकला होता. अशा स्थितीत केवळ माझ्या शब्दाखातर कंपनीने कारखाना चालवायला घेतला. वार्षिक सभेचा निर्णय आणि शासनाच्या नियमाप्रमाणेच कारखाना चालवायला देण्यात आला आहे. एकाही अध्यक्षाने कारखान्याच्या हिताकडे लक्ष दिले नाही. त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच कारखान्याचे विस्तारीकरण आणि विकास झाला नाही. जुनी झालेली मशिनरी आणि कामगारांच्या पगारापोटीच वर्षाला १५ कोटींचा खर्च अशा स्थितीत कारखाना फायद्यात येऊ शकत नाही. तरीदेखील कंपनीने एफआरपीप्रमाणे उसाची बिले दिली आहेत. आता कारखाना कर्जमुक्त झाला आहे. स्टेट बँक आणि युनियन बँकेच्या थकीत देण्याबाबत शहानिशा करण्यासाठी शासनाने कमिटी नेमली आहे. १० वर्षांच्या करारातील दोन वर्षे संपली आहेत. बँकेच्या थकबाकीबाबत निर्णय झाल्यास आणखी चार वर्षे अशी १२ वर्षे मिळतील. ब्रीसक् कंपनीने गुंतविलेल्या रकमेचे हप्ते पाडून देतो. कंपनीला व संचालकांनाही विनंती करून कारखाना चालवायला देण्यास सांगतो, शहापूरकरांनी आहे त्या स्थितीत कारखाना चालवायला घ्यावा, असे आव्हानही मुश्रीफांनी यावेळी दिले. यावेळी सतीश पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी) ..तर आनंद झाला असता डेक्कन अ‍ॅग्रोला शरद पवारांकडून मदत मिळवून देतो असे सांगून फसविल्याचा खोटा आरोप बाबासाहेब कुपेकरांवर त्यांच्या पश्चात करणाऱ्या शहापूरकरांनी स्वत:च्या कर्तृत्वामुळे बंद पाडलेला ‘डेक्कन’ पुन्हा चालू करतो, कामगारांचा थकीत पगार देतो, त्यांच्याकडून नोकरीसाठी घेतलेले पैसे परत देतो, असे जाहीर केले असते तर मला आनंद झाला असता, असा टोलाही मुश्रीफ यांनी शहापूरकरांना लगावला. बाभूळकर यांचे कौतुक ‘एव्हीएच’ विरोधात सनदशीर व कायदेशीर संघर्ष करून डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी तो प्रकल्प माघारी परतवून पाठविण्यात यश मिळविले. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज आज हयात असते तर त्यांनी त्यांची बग्गीतून मिरवणूक काढली असती, अशा शब्दांत आमदार मुश्रीफ यांनी बाभूळकर यांचे कौतुक केले.