शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांची ‘पाणीबंदी’बाबत सहकार्याची भूमिका

By admin | Updated: September 3, 2015 00:20 IST

काटकसरीसह पर्यायी व्यवस्थेची तयारी : दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी उपलब्धतेसाठी उपाययोजना

कोल्हापूर : भूकंप, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींवेळी कोल्हापुरातील उद्योजक-व्यावसायिकांनी सामाजिक जबाबदारी जोपासली आहे. त्यातील आणखी एक पाऊल म्हणून राज्यातील दुष्काळग्रस्तांची तहान भागविण्यासाठी शासनाने उद्योगांना पाणीपुरवठा बंद करण्याच्या निर्णयाबाबत त्यांची सहकार्याची भूमिका राहणार आहे. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्यासह काही पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.दुष्काळग्रस्त भागातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक, कोकण आणि विदर्भ वगळता राज्यातील उद्योगांना पाणीपुरवठा बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत ‘लोकमत’ने जिल्ह्यातील उद्योजकांची भूमिका जाणून घेतली.विदर्भ, मराठवाड्यासह अन्य दुष्काळग्रस्त परिसरांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. शिवाय जिल्ह्यातील १३ धरणांनी जवळजवळ दरवर्षीप्रमाणे पुरेशा पाणीसाठ्याची टक्केवारी गाठली आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणीटंचाईचा फारसा प्रश्न उद्भवणार नाही. उत्पादन प्रक्रियेसाठी अधिक पाणी लागणाऱ्या उद्योग-व्यवसायांची संख्या तुलनेने येथे कमी आहे. फौंड्री उद्योगामध्ये वीजभट्टी असल्याने तिच्याभोवती सतत पाणी सोडावे लागते. जितके पाणी सोडावे लागते त्याच्या पाऊण प्रमाणात ते परत मिळते. कापड गिरणीमध्येही पाण्याचा अधिक वापर होतो. औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणाऱ्या पाण्याऐवजी टँकर, कूपनलिका अशा पर्यायी व्यवस्थेनेही हे उद्योग पाणी मिळवितात. पाणीबंदी लागू झाल्यास त्यांना या पर्यायांचा आधार घ्यावा लागणार आहे. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्यासह पर्यायी व्यवस्था करण्याची उद्योजक-व्यावसायिकांची तयारी आहे. (प्रतिनिधी)महिन्याकाठी लागते २० ‘एमएलडी’ पाणीजिल्ह्यातील तीन प्रमुख औद्योगिक वसाहतींतील सुमारे दहा हजार उद्योगांना महिन्याकाठी १८ ते २० दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणी लागते. यात कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींसाठी १० ते १२, गोकुळ शिरगावसाठी सहा आणि शिरोलीसाठी दोन एमएलडी पाणी लागते. औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा दर प्रतिहजार लिटर १ रुपया २५ पैसे इतका आहे.