शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारी वाचविण्यासाठी रस्त्यावर

By admin | Updated: November 9, 2014 23:31 IST

हसन मुश्रीफ : आजरा कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ

आजरा : साखरेचे दर वाढत नाहीत तोपर्यंत उसाला जादा दर देता येत नाही. साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. सद्य:स्थितीत शासनाकडून भरीव अनुदान थेट ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचले जाण्याची गरज आहे. यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेला आपला पाठिंबा आहे. सध्या केंद्रात व राज्यात आपण विरोधी बाकावर असल्याने साखर कारखानदारी वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरणार, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.आजरा साखर कारखान्याच्या १८व्या गळीत हंगाम प्रारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी आ. संध्यादेवी कुपेकर होत्या. उपस्थितांचे स्वागत उपाध्यक्ष मारुतीराव घोरपडे यांनी केले. यावेळी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर म्हणाले, शेतकऱ्यांनी व सभासदांनी दाखविलेल्या विश्वासास तडा न जाऊ देता किमान वैधानिक दरापेक्षा जादा दर कारखान्याकडून दिला गेला आहे. सध्या बाजारातील साखरेचे दर पाहता ऊस वाहतुकीसह कारखाना कर्मचारी पगार व इतर खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसणे कठीण आहे. डिस्टीलरीचा छोटा प्रकल्प सुरू करून उत्पन्न वाढविण्यास संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. कारखानदारी मोडीत निघाल्यास अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होतील, यासाठी सरकारकडून साखर कारखान्यांबाबत सकारात्मक निर्णय होणे गरजेचे आहे.माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, गेल्या दोन-तीन वर्षांत साखर कारखानदारीसमोर नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. उत्पादित साखरेसाठी प्रत्येक पोत्यामागे सरकारने ५०० रुपये थेट अनुदान द्यावे. अडचणी आहेत म्हणून संचालक मंडळाने खचून न जाता सहवीज प्रकल्प, डिस्टीलरी प्रकल्प यांसारखे उपक्रम हाती घ्यावेत.आ. मुश्रीफ म्हणाले, गेले पंधरा वर्षे आघाडी सरकारची सत्ता होती; आता बसपाळी मिळाली आहे. सत्ता गेल्यामुळे लोकांची कामे करण्यावर अनेक मर्यादा येत आहेत. येथून पुढे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येण्याची तयारी ठेवावी, कारण आंदोलनाशिवाय आता पर्याय नाही. के. पी. पाटील हे जिद्दी असल्याने भविष्यात त्यांचे लालदिव्याचे स्वप्न साकार होईल, असेही स्पष्ट केले.यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर, मुकुंदराव देसाई, अशोक चराटी, वसंतराव धुरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या संजीवनी गुरव, विलास नाईक, विजयकुमार पाटील, उपसभापती दीपक देसाई, तुळशीराम कांबळे, सुधीर देसाई, रामराजे कुपेकर, बी. एन. पाटील, राजू होलम, अनिल फडके, असलम खेडेकर, कारखान्याचे संचालक, कर्मचारी, सचिव व्यंकटेश ज्योती यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक पी. एल. हरेरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)