शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

धनगरवाड्यावरील रस्त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST

आजरा : आवंडी धनगरवाडा रस्त्याच्या कामामुळे विकासापासून वंचित भागाला न्याय मिळाला असून यापुढे पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे स्पष्ट ...

आजरा : आवंडी धनगरवाडा रस्त्याच्या कामामुळे विकासापासून वंचित भागाला न्याय मिळाला असून यापुढे पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन आजरा-राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चित्री धरण फाटा ते आवंडी धनगरवाडा रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. आवंडी धनगरवाड्यावरील महिलांनी आमदार आबीटकर यांसह मान्यवरांचे कुंकूमतिलक व आरती ओवाळणी करून स्वागत केले. आमदार आबीटकर यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. चित्री धरणाच्या बांधकामानंतर या रस्त्याला मोठा निधी देऊन काम होत असल्याबद्दल कॉ. संपत देसाई यांनी समाधान व्यक्त केले. चित्री प्रकल्प व परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. स्वातंत्र्यानंतरही धनगरवाड्यावर रस्त्याचे ग्रामस्थांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे. रस्त्याबरोबर, वीज व अन्य मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही आमदार आबीटकर यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समिती सदस्या रचना होलम, राजू होलम, जनार्दन टोपले, बाबू भेडगे, सुरेश होडगे, रणजित सरदेसाई, विजय थोरवत, प्रा. अनिल मगर, वृषाल हुक्केरी, डी. टी. पवार, रामचंद्र पाटील, शिवसेना डिलाई रोड शाखाप्रमुख गोपाळ खाडे, बयाजी येडगे, गोविंद गुरव, संजय शेणवी, रवींद्र भाटले, प्रवीण सरदेसाई, शिवाजी आढाव, गंगाराम कोकरे, गंगाराम येडगे, बजाजी मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळी : आवंडी धनगरवाडा (ता. आजरा) येथील कार्यक्रमात बोलताना आमदार प्रकाश आबीटकर. शेजारी संपत देसाई, बाबू येडगे, जनार्दन टोपले, गोपाळ खाडे आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०८०२२०२१-गड-०३