शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्याच्या मरणकळा ‘स्थायी’पर्यंत पोहोचल्याच नाहीत

By admin | Updated: May 24, 2014 01:02 IST

कोल्हापूर : शहराचे वैभव असलेला रंकाळा अखेरची घटका मोजत आहे. संरक्षक तटबंदी कोसळून रंकाळ्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

 कोल्हापूर : शहराचे वैभव असलेला रंकाळा अखेरची घटका मोजत आहे. संरक्षक तटबंदी कोसळून रंकाळ्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. तटबंदीसाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार आहे. लाखावर निधी उपलब्ध करून देऊ, तातडीने दुरुस्ती करु, अशी पोकळ आश्वासने देण्यात पदाधिकारी दंग आहेत तर दुसरीकडे पैशांअभावी काम रखडल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कोल्हापूरच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आज (शुक्रवारी) महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज गांभीर्याने चर्चा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, एकाही सदस्यांने याबाबत ‘ब्र’ही काढला नाही. यावरूनच रंकाळ्याविषयी असलेली पदाधिकार्‍यांची आस्था किती बेगडी आहे व त्यांच्या घोषणा या ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ असल्याचे चित्र स्पष्ट झाले. चार महिन्यांपूर्वी कोसळलेल्या रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडील बाजूची कोसळलेल्या तटबंदी दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यातच पंधरा दिवसांपूर्वी तटबंदीचा आणखी एक मोठा भाग कोसळला तर चार दिवसांपूर्वी उद्यानाकडील बाजूची तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळली. याबाबत ठोस उपाययोजना न राबविल्यास उद्यानाकडील तटबंदीचा मोठा भाग पाण्यात कोसळण्याची शक्यता आहे. महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका रंकाळा तलावास बसत आहे. शालिनी पॅलेससमोरील रंकाळा उद्यान परिसरात तलावाच्या आतील बाजूच्या तटबंदीमधील दोन दगडांना सांधून ठेवणार्‍या सिमेंटचा दर्जा खराब झाल्याने तटबंदीचे दगड कोसळत आहे. नारळाच्या झाडांच्या मुळामुळे तटबंदी धोका पोहोचत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. मात्र, झाडे न तोडताही तटबंदी सुरक्षित करता येऊ शकते. मात्र, चर्चेपलीकडे महापालिकेत ठोस कारवाईसाठी काहीही होताना दिसत नाही. शालिनी पॅलेससमोरील संपूर्ण तटबंदी वेडी-वाकडी झाली आहे. कोणत्याही क्षणी ही तटबंदी कोसळू शकते इतकी जमीन भुसभुशीत झाली आहे. दगड एकमेकांपासून सुटत आहेत. सुदैवाने तटबंदी कोसळल्याने पर्यटकांच्या जीवितहानी झालेली नाही. मात्र, महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे पर्यटकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी तलावाच्या तटबंदीचा एक भाग कोसळला होता. त्या कोसळलेल्या भागात सिमेंट कॉँक्रिटच्या साहाय्याने बिम टाकून तटबंदीच्या वरील भागाला आधार दिला आहे. परंतु पाण्याकडील भाग अद्याप दुरूस्त करण्यात आलेला नाही. हे काम पैसे नसल्याने अत्यंत कासवगतीने सुरू आहे. या कोसळलेल्या तटबंदीचे काम अपूर्ण असतानाच त्याच कोसळलेल्या भागापासून पन्नास फुटांवरील काही भाग पुन्हा कोसळला. त्यामुळे ही संपूर्ण तटबंदीच धोकादायक बनली आहे. रंकाळ्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी स्थायी समितीमध्ये ठोस तरतूद होईल, अशी रंकाळाप्रेमींना आशा होती, मात्र, चकार शब्दही बैठकीत सदस्यांनी काढला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)