Kolhapur Crime: दारु पिताना शिवीगाळ केल्याने रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून, मणेर मळ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:54 IST2026-03-10T11:54:43+5:302026-03-10T11:54:58+5:30

दोघा संशयितांना अटक

Rickshaw driver stoned to death for abusing him while drinking alcohol in Maner Mall Kolhapur | Kolhapur Crime: दारु पिताना शिवीगाळ केल्याने रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून, मणेर मळ्यातील घटना

Kolhapur Crime: दारु पिताना शिवीगाळ केल्याने रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून, मणेर मळ्यातील घटना

गांधीनगर, उचगाव : दारु पिऊन शिवीगाळ केल्याने उचगाव (ता. करवीर) येथील मणेर मळ्यात प्रशांत बाबूराव पंडित (वय ३८, रा. यादववाडी, उचगाव, ता. करवीर ) या रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून केला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी यश दीपक दोरकर (वय २१, रा. यादववाडी, उचगाव) आणि अमित खुदबुद्दीन आयनापुरे (वय २२, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची माहिती अशी की, प्रशांत हा रिक्षाचालक असून, येथील मणेर मळा रिक्षा स्टॉपचा तो माजी अध्यक्ष आहे. आई, वडील, पत्नी आणि एका मुलासह तो यादववाडी येथे राहतो. काल सायंकाळी प्रशांत हे घरातून एका कामासाठी बाहेर गेले, परंतु घरी परतले नाहीत. सोमवारी सकाळी येथील हनुमान मित्रमंडळाच्या खोलीच्या मागे प्रशांतचा मृतदेह डोक्यात दगड घालून खून झाल्याच्या स्थितीत आढळून आला.

खून झाल्याची घटना परिसरात पसरताच बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. घटना समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, गांधीनगरचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. 

पोलिसांनी तातडीने श्वानपथक पाचारण केले. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळे आणि पोलिस अंमलदारांचे पथक तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिस अंमलदार वैभव पाटील आणि विशाल खराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, हा खून यश दोरकर आणि अमित आयनापुरे यांनी केल्याचे समजले.

यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने भारती विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांना गुन्ह्याबाबत विचारले असता प्रशांतने शिवीगाळ केल्याने त्याला दगडाने ठेचून मारल्याचे त्यांनी सांगितले. या संशयित आरोपींना पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे करत आहेत.

Web Title : कोल्हापुर: शराब पीने के बाद विवाद में रिक्शा चालक की हत्या; दो गिरफ्तार

Web Summary : कोल्हापुर में शराब के नशे में विवाद के बाद एक रिक्शा चालक को पत्थर से मार डाला गया। पुलिस ने दो संदिग्धों, यश दोरकर और अमित आयनापुरे को गिरफ्तार किया। घटना मनेर माला, उचगांव में हुई। जांच जारी है।

Web Title : Kolhapur: Drunk Man Killed After Argument; Two Arrested

Web Summary : A रिक्षाचालक (rickshaw driver) was stoned to death in Kolhapur after an argument fueled by alcohol. Police arrested two suspects, Yash Dorkar and Amit Aynapure. The incident occurred in Maner Mala, Uchgaon. Investigation ongoing.