शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा संघटनांत फूट

By admin | Updated: August 26, 2015 00:09 IST

भाडेवाढीची ‘कॉमन मॅन’ची मागणी : जिल्हा संघर्ष समितीचा विरोध

कोल्हापूर : पेट्रोल व डिझेलच्या किमतीतील चढ-उतार होत आहे. यावरून रिक्षांच्या प्रवासी भाडेवाढबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा संघटनेत फूट पडली आहे. कॉमन मॅन तीन आसनी रिक्षाचालक व असंघटित क्षेत्र कामगार संघटनेच्यावतीने महागाईमुळे रिक्षाच्या प्रवासी भाड्यात वाढ करावी, अशी मागणी केली आहे. तर जिल्हा अ‍ॅटो संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शहरातील ११ संघटनांनी ही प्रवासी भाडेवाढ करू नये, अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन दोन्हीही संघटनांनी उपप्रादेशिक अधिकारी राजू वर्मा यांच्याकडे केली. यामुळे भाडेवाढबाबत काही रिक्षाचालकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.कॉमन मॅन तीन आसनी रिक्षाचालक व असंघटित क्षेत्र कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने वर्मा यांची भेट घेतली. अ‍ॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, महागाई वाढत आहे शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना महागाई निर्देशांकाच्या तुलनेत महागाई भत्त्यात वाढ होत असते, परंतु रिक्षा हा सार्वजनिक वाहतुकीचा घटक असूनदेखील उर्वरित महाराष्ट्रात रिक्षा भाडेवाढ होऊन देखील कोल्हापुरात भाडेवाढ झाली नाही. कोल्हापुरातील जनतेला आर्थिक भुर्दंडात न टाकणारी भाडेवाढ त्वरित करावी. यासह मीटर दरवाढ पहिल्या टप्प्याकरिता वीस व पुढील टप्प्यासाठी पंधरा रुपये करावे. अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, तसेच जुन्या परमिटांचे नूतनीकरण करून द्याव, अशी मागणी यावेळी केली. शिष्ठमंडळात अविनाश दिंडे, नितीन दुधगांवकर, श्रीकांत पाटील, संजय भोळे, जाफर मुजावर, राजू कांबळे, शकील महात, नरेंद्र पाटील, सूर्यकांत पाटोळे, वासीम पठाण, अनिल मांडरे, प्रफुल्ल काळे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. भाडेवाढ नकोपेट्रोल व डिझेल यांचे वारंवार कमी होणारे भाव आणि नवीन केएमटी बसेस आल्यामुळे प्रवासी वाहतुकीची स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा अवस्थेत रिक्षा व्यवसाय टिकविणे कठीण झाले आहे. त्यामुळे भाडेवाढ मागणे हे प्रवासी आणि रिक्षा व्यावसायिकांच्या दृष्टीने अयोग्य ठरणार आहे. त्यामुळे कोणतीही भाडेवाढ करू नये, अशी मागणी जिल्हा अ‍ॅटो रिक्षा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ११ रिक्षा संघटनांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे. यामध्ये चालक-मालक संघटना, महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना, काँग्रेस आय अ‍ॅटो, विद्यार्थी वाहतूक संघ, आदर्श अ‍ॅटो, शिवशक्ती अ‍ॅटो संघ, शाहू रिक्षा मित्र मंडळ, शेअर-ए-रिक्षा संघटना, हिंदुस्थान रिक्षा संघटना यांचा समावेश आहे.