शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिदिनापासून ‘आयआरबी चले जाव’

By admin | Updated: July 27, 2014 01:04 IST

टोलप्रश्न; धरणे धरणार; आमरण उपोषण; जलसमाधी घेण्याचा इशारा

कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्याच्या आश्वासनाची पूर्तता राज्य सरकारने ८ आॅगस्टपर्यंत करावी अन्यथा क्रांतिदिनापासून ‘आयआरबी चले जाव’चा नारा देत आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल, असा इशारा देतानाच ९ आॅगस्ट रोजी भवानी मंडपात एक दिवसाचे धरणे धरण्याचा निर्णय आज सायंकाळी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आचारसंहिता लागण्यापूर्वी टोल रद्द झाला नाही तर निवडणुकीत विरोध करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. कृती समितीच्या सुमारे तासभर चाललेल्या बैठकीनंतर अध्यक्ष निवासराव साळोखे यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. ८ आॅगस्टपर्यंत टोल रद्द करण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कोल्हापुरातील नव्या क्रांतीची लढाई सुरू होईल. ९ आॅगस्ट रोजी सागरमाळ येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून कृती समितीचे सर्व कार्यकर्ते मोर्चाने भवानी मंडपात येतील आणि दिवसभर धरणे धरतील. त्यानंतर १५ आॅगस्ट रोजी जनतेच्या वतीने गांधी मैदानावर ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शासकीय ध्वजारोहण समारंभाऐवजी जनतेने गांधी मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन साळोखे यांनी केले आहे. मूल्यांकन समितीचे काम लांबत जाईल आणि आचारसंहितेची तारीख जवळ येईल तशी टोलविरोधी आंदोलकांत तीव्र नाराजी निर्माण होऊ लागली आहे. आजच्या बैठकीत अनेकांनी सरकारबद्दल आणि मंत्र्यांबद्दल संताप व्यक्त केला. एवढेच नाही तर कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत आता त्यांच्या दारात न जाण्याचा निर्णय घेतला गेला. बैठकीत पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची इच्छा काही कार्र्यकर्त्यांनी व्यक्त केली. परंतु उपोषण न करता ‘आयआरबी चले जाव’चाच लढा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला. बाबा इंदुलकर, अनिल घाटगे, दिलीप देसाई यांनी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री जनतेच्या बाजूने राहणार नसतील तर त्यांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घ्या अशी सूचना इंदूलकर यांनी केली. एकदा आमरण उपोषण सुरु केल्यावर कोणाही नेत्याचे ऐकून घेणार नाही, असा इशारा देसाई यांनी दिला. प्रसाद जाधव यांनी आम्ही काही कार्यकर्ते जलसमाधी घेण्यास तयार असल्याचे जाहीर केले. यावेळी लालासाहेब गायकवाड, पंडितराव सडोलीकर यांनीही मते मांडली. (प्रतिनिधी)