प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतेची जबाबदारी कार्यालयांचीच - संभाजी माने : कोअर कमिटी करून निधीची तरतूद करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST2021-03-04T04:44:56+5:302021-03-04T04:44:56+5:30

कोल्हापूर : कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या अंतर्गत सुविधा व स्वच्छतेची जबाबदारी तेथील सर्व कार्यालयांची आहे. त्यासाठी सार्वजनिक ...

The responsibility for the cleanliness of the administrative building lies with the offices - Sambhaji Mane: Funds should be provided by the core committee | प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतेची जबाबदारी कार्यालयांचीच - संभाजी माने : कोअर कमिटी करून निधीची तरतूद करावी

प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतेची जबाबदारी कार्यालयांचीच - संभाजी माने : कोअर कमिटी करून निधीची तरतूद करावी

कोल्हापूर : कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या अंतर्गत सुविधा व स्वच्छतेची जबाबदारी तेथील सर्व कार्यालयांची आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दोष देणे योग्य नाही. या सुविधांसाठी सर्व कार्यालयांची एक कोअर कमिटी स्थापन करुन त्याअंतर्गत निधीची तरतूद करावी व एजन्सी नेमावी अशी सूचना विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी केली आहे.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील अस्वच्छता व गैरसोयींबद्दल लोकमतमध्ये २७ फेब्रुवारीच्या अंकात कोंडाळा नव्हे प्रशासकीय इमारत हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामध्ये या इमारतींमधील कार्यालये, तेथील अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था, कर्मचारी व नागरिकांची गैरसोय यावर प्रकाश टाकण्यात आला होता. इमारतीची देखभाल व दुरुस्तीबाबत वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यानंतरही त्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप या कार्यालयांनी केला होता. यावर माने यांनी भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, इमारतीची गळती, दुरुस्ती, अशी कामे असतील विभागाला जबाबदार धरले जावे. परिसराची स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता, पाणी ही कामे सार्वजनिक बांधकामची नाहीत त्यामुळे आम्ही ती करु शकत नाही. जिल्हाधिकारी कार्यालय असो वा पोलीस मुख्यालय या शासकीय कार्यालयांनी स्वच्छतेसाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त केली आहे, त्यासाठी निधीची तरतूद केली आहे. अशाच प्रकारे प्रशासकीय इमारतीतील २३ कार्यालयांनी मिळून हा निर्णय घ्यायचा आहे, अन्य विभागांवर जबाबदारी न ढकलता या कार्यालयांनी एकत्र बैठक घेऊन एक कोअर कमिटी स्थापन करावी, प्रत्येक विभागाने आपल्याकडील ठरावीक निधीची तरतूद करावी त्यातून कमिटीने स्वच्छता व सुरक्षेसाठी एजन्सी नियुक्त करावी. असे केल्यास इमारतीचे सगळे प्रश्न निकाली लागतील.

---

सूचना : इमारतीचा फोटो वापरावा

Web Title: The responsibility for the cleanliness of the administrative building lies with the offices - Sambhaji Mane: Funds should be provided by the core committee