शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘माय मराठी’तील चित्रपटांना प्रतिसाद

By admin | Updated: December 28, 2016 01:05 IST

किफ्फ महोत्सव : ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अ‍ॅन्ड चॉकलेट’, ‘सायकल’चे सादरीकरण

कोल्हापूर : प्राणी व मानवी जीवनातील भावबंध सांगणाऱ्या ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अ‍ॅन्ड चॉकलेट’ व आजोबांनी मृत्यूपत्राद्वारे दिलेली सायकल चोरीला गेलेल्या गंमती-जंमतीवर आधारित धम्माल मराठी चित्रपट ‘सायकल’ या माय मराठी विभागातील कलाकृतींना महोत्सवाच्या सहाव्या दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र शासन पुरस्कृत कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे राजर्षी शाहू स्मारक येथे सुरू असलेल्या पाचव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मंगळवारी तेरा चित्रपट व सहा लघुपटांचे सादरीकरण झाले.माथेरानच्या सुंदर निसर्गरम्य परिसरात चित्रित करण्यात आलेल्या गिरीश विश्वनाथ दिग्दर्शित ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अ‍ॅन्ड चॉकलेट’मधून व्हॅनिला या कुत्री व तेजश्री या दहावीत शिकणाऱ्या नायिकेच्या जीवनातील एकमेकांच्या भावनिक विश्वावर प्रकाश टाकण्यात आला. एका भटक्या कुत्रीचा लळा लागलेल्या कुटुंबावर हा चित्रपट आधारित असून कालांतराने ती त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनून जाते. तिच्या हरवण्याने कुटुंबाची झालेली मानसिक चलबिचल व तिचा शोध घेण्यासाठी चाललेला जीवाचा आटापिटा म्हणजे ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अ‍ॅन्ड चॉकलेट’होय. सायंकाळच्या सत्रात प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘सायकल’ हा चित्रपट दाखविण्यात आला. ‘कॉफी आणि बरंच काही’ , ‘ अ‍ॅन्ड जरा हटके’ या आपल्या दोन चित्रपटांतून वेगळेपण सिद्ध करणाऱ्या कुं टे यांनी सायकलमधून अफलातून विनोदाची सैर घडविली. स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटात ज्योतिषी असलेल्या केशवला त्याच्या आजोबांनी मृत्युपत्राद्वारे सायकल दिलेली असते. एक दिवस ती चोरीला जाते. मग सुरू होतो केशव आणि चोरांमध्ये पाठशिवणीचा खेळ. त्यामधून सामाजिक परिस्थतीवर विनोदी पद्धतीने भाष्य केले आहे. दरम्यान, दिवसभरात विविध भाषांतील चित्रपटांचे सादरीकरण झाले. परंपरा आणि मानवी मूल्यांचे चित्रण असलेला सब्याची मोहपात्रा दिग्दर्शित ‘अदिम विचार’, फुटबॉलची मॅच पाहण्यासाठी नाना तऱ्हेच्या क्लृप्त्या लढविणाऱ्या एका मुलाची कथादिग्दर्शक अब्बास किरओस्तामी यांनी ‘द ट्रॅव्हलर’ मांडण्यात आली. डॉ. स्टॅन्ली कुरबिक दिग्दर्शित डॉ. स्ट्रॅग्लेव्ह आॅर : हाऊ आय लर्न्ड टू स्टॉप वरिंग अ‍ॅन्ड लव्ह, ‘२००१: ए स्पेस ओडिसी’ दिग्दर्शक थॉमस व्हिटेंरबर्ग यांचा ‘द हंट’, दिग्दर्शक रेझा मिरकारिमी यांचा ’अ क्युब आॅफ शुगर‘, दिग्दर्शक मार्टिन कोटिक यांचा ‘आॅल द बेस्ट’, दिग्दर्शक गेर्ड सॅचिंडर यांचा ‘द कल्पेबल’ आदी चित्रपट दाखविण्यात आले.