स्पर्धा परीक्षेच्या शंकांचे शुक्रवारी होणार निरसन

By Admin | Updated: May 27, 2015 00:57 IST2015-05-27T00:35:53+5:302015-05-27T00:57:32+5:30

व्याख्यान : ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे आयोजन

Resolutions to be held on Friday for competitive examinations | स्पर्धा परीक्षेच्या शंकांचे शुक्रवारी होणार निरसन

स्पर्धा परीक्षेच्या शंकांचे शुक्रवारी होणार निरसन

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा, करिअरची संधी कुठे आहे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात घोळत असतात. या प्रश्नांची योग्य उत्तरे कुठे मिळतात? प्रत्येकजण वेगवेगळे सांगत असतो; त्यामुळे मनात अनेक शंकांचे कल्लोळ माजलेले असतात. याच शंकांचे योग्य निरसन करण्यासाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’ व पुणे येथील ‘द युनिक अकॅडमी’तर्फे शुक्रवारी (दि. २९) ‘स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी व करिअरची संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी अकरा वाजता हे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानात ‘द युनिक अकॅडमी’चे प्रशिक्षक प्रा. हर्षल लवंगारे मार्गदर्शन करणार आहेत. लवंगरे हे यूपीएससी व एमपीएससी परीक्षेच्या अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तके वाचावीत, स्पर्धा परीक्षेमधील करिअरची विविध संधी याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत व खुला आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी उद्या, गुरुवारपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत प्रवेशिका घेऊन जाव्यात. ( प्रतिनिधी )

Web Title: Resolutions to be held on Friday for competitive examinations