शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

माळवींच्या ठरावात आडकले बजेटचे घोंगडे

By admin | Updated: April 5, 2015 00:28 IST

‘बजेट’वर सहीची प्रतीक्षा : १७ एप्रिलनंतरच मंजुरी

कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव शासनाला पाठविण्याबाबतच्या प्रस्तावावर महापौरांनी अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. यासह बजेट मंजुरीचे प्रस्तावही महापौरांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. रस्त्यांची कामे १५ मेनंतर केली जात नाहीत; त्यामुळे किमान बजेटच्या ठरावावर महापौरांची स्वाक्षरी व्हावी, यासाठी नगरसेवक प्रयत्नशील आहेत. दरम्यान, १७ एप्रिलपूर्वी कोणत्याही ठरावावर स्वाक्षरी होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. महापौर माळवी यांना पदावरून दूर करण्याचा चंग कॉँग्रेस राष्ट्रवादीने बांधला आहे. सभागृहात त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर केला. नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विनंती केली. महापौरांनी विरोधातील प्रस्तावासह बजेट मंजुरीचे प्रस्तावही रोखले आहेत. महापालिकेची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत असल्याने नगरसेवकांना बजेट खर्च करण्याची घाई लागली. बजेटमधील बहुतांश रक्कम रस्ते व गटारींसारख्या पायाभूत सुविधांवरच खर्च होणार आहे. हा निधी खर्च करण्यासाठी नगरसेवकांच्या हातात फक्त दीड महिन्याचा कालावधी आहे. १५ मेनंतर रस्ते व गटारींची कामे करता येणार नाहीत. यानंतर पावसाळा व लगेच निवडणुकींचे पडघम वाजणार आहेत. त्यामुळे बजेटच्या प्रस्तावावर महापौरांची स्वाक्षरी व्हावी, यासाठी नगरसेवक प्रयत्न करीत आहेत. सभागृहात व बाहेर राजीनाम्यावरून कोंडी करणाऱ्या नगरसेवकांची महापौरांनी सर्व ठराव रोखून धरत कोंडी सुरू केली. मागील वेळेच्या काही महापौरांनी सहा-सहा महिन्यांपर्यंत ठराव रोखून धरल्याने नगरसेवकांची पंचाईत झाली होती. (प्रतिनिधी)