शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसपाटील पदांची आरक्षणे घोषित

By admin | Updated: November 24, 2015 00:21 IST

४५ गावांचा समावेश : शिरोळ, हातकणंगले तालुका

इचलकरंजी : येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील रिक्त असलेली पोलीसपाटलांची पदे भरण्यासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. एकूण ४५ गावांपैकी सर्वसाधारण (खुला) वर्गासाठी १३, सर्वसाधारण (महिला) आठ, अनुसूचित जाती दोन, अनुसूचित जाती (महिला) एक, अनुसूचित जमाती पाच, अनुसूचित जमाती (महिला) दोन, विमुक्त जाती (अ) दोन, भटक्या जमाती (ब) एक, भटक्या जमाती (क) एक, इतर मागासवर्ग सात व इतर मागासवर्ग (महिला) तीन, अशी आरक्षणे टाकण्यात आली. ही आरक्षणे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकली.इचलकरंजी उपविभागांतर्गत शिरोळ व हातकणंगले या दोन तालुक्यांत पोलीसपाटलांची ४५ पदे रिक्त होती. त्यांच्यासाठी शुक्रवारी काढण्यात आलेल्या सोडतीवेळी शिरोळचे तहसीलदार सचिन गिरी, हातकणंगलेचे तहसीलदार दीपक शिंदे, नायब तहसीलदार अनिल साळुंखे, लिपिक बबन पाटील, अनिल शिंदे, काही गावांतील सरपंच व नागरिक उपस्थित होते. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षणे निश्चित करण्यात आली. या आरक्षणांमधून महिलांसाठी चिठ्ठी पद्धतीने आरक्षणे काढली गेली. (प्रतिनिधी)गावनिहाय टाकण्यात आलेली आरक्षणे पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती (महिला) : रुकडी. अनुसूचित जाती : कोरोची व पट्टणकोडोली. अनुसूचित जमाती (महिला) : शिरढोण व उदगाव. अनुसूचित जमाती : लाटवडे, जांभळी, हेरवाड, टाकवडे व अकिवाट. विमुक्त जाती (अ) : कुंभोज व उमळवाड. भटक्या जाती (ब) : यळगूड. भटक्या जमाती (क) : चंदूर. इतर मागासवर्ग (महिला) : राजापूर, साजणी व भेंडवडे. इतर मागासवर्ग : इंगळी, शिरटी, नागाव, यड्राव, तळंदगे, खोची व नेज. सर्वसाधारण (खुला-महिला) : टाकळी, मजरेवाडी, मजले, खिद्रापूर, दानवाड, हालोंडी, हरोली व कुटवाड. सर्वसाधारण (खुला) : नांदणी, दानोळी, गणेशवाडी, औरवाड, शिवनाकवाडी, निमशिरगाव, चिंचवाड, चोकाक, माले, मुडशिंगी, पाडळी, बस्तवाड व तमदलगे.४पोलीस पाटलांची पदे लवकरच लेखी व तोंडी परीक्षेद्वारे भरण्यात येतील. त्यासाठी प्रांताधिकारी, दोन पोलीस उपअधीक्षक व दोन तहसीलदार यांच्या समितीद्वारे या परीक्षांमधील उत्तरपत्रिका व तोंडी परीक्षेचे परीक्षण करण्यात येऊन निवड केली जाईल.