शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

पोखले येथील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:20 IST

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पोखले गावातील तीस फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढून किरकोळ उपचारानंतर अधिवासात ...

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पोखले गावातील तीस फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढून किरकोळ उपचारानंतर अधिवासात मुक्त केले.

पोखले येथील विहिरीत गुरुवारी, १ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याने भरलेल्या विहिरीत कोल्हा पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी ती तत्काळ पन्हाळा वनविभागाचे वनरक्षक अमर माने, वनपाल विजय दाते आणि वनक्षेत्रपाल प्रियांका दळवी यांना दिली. त्यांनी या कोल्ह्याच्या बचावकार्यासाठी कोल्हापूर वन्यजीव संक्रमण उपचार केंद्राला पाचारण केले.

कोल्हापूर वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर आणि त्यांच्या पथकाने रात्री घटनास्थळी पोहोचून लगेच बचावकार्य सुरू केले. तीस फूट खोल विहिरीत पडलेल्या या कोल्ह्याने विहिरीतील दगडाच्या आधार घेतला होता. डॉ. वाळवेकर आणि ऋषीकेश मेस्त्री सुतार यांनी विहिरीत उतरुन लगेचच या कोल्ह्यास सुखरूप पिंजऱ्यात घेऊन विहिरीबाहेर काढले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत विहिरीपासून थोड्या अंतरावर या कोल्ह्याला अधिवासात मुक्त करण्यात आले.

यावेळी वनरक्षक, वनपाल तसेच डॉ. संतोष वाळवेकर यांनी ग्रामस्थांना कोल्ह्याचा अधिवास आणि अधिवासातील कोल्ह्याचे महत्त्व सांगितले. या बचाव कार्यात कोल्हापूरचे उपवन संरक्षक रावसाहेब काळे, सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील निकम, वनसेवक पांडुरंग पाटील यांच्यासह वन्यजीव संक्रमण उपचार केंद्राचे अक्षय निकम, यश मयेकर, सिद्ध छेडा, अमित कुंभार, सम्या टायसन तसेच जयवंत मगदूम, अमोल कुंभार,मारुती महापुरे या ग्रामस्थांनी भाग घेतला.

--------------------------------

फोटो -02042021-kol-kolha1

पन्हाळा तालुक्यातील पोखले गावातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाच्या पथकाने सुखरूप पिंजऱ्यात घेऊन विहिरीबाहेर काढले.

(संदीप आडनाईक)

===Photopath===

020421\02kol_2_02042021_5.jpg

===Caption===

फोटो -02042021-kol-kolha1(संदीप आडनाईक )