शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्डावर कोल्हापूरला प्रतिनिधित्व द्या

By admin | Updated: December 14, 2015 01:10 IST

प्रफुल्ल महाजन : नाट्य परिषद शाखा अध्यक्षांच्या मेळाव्यात मागणी

कोल्हापूर : सेन्सॉर बोर्डावर कोल्हापूरला प्रतिनिधित्व द्या. स्थानिक पातळीवर प्रायोगिक नाटकांना अनुदान द्यावे. अखिल भारतीय नाट्य संमेलनासह विभागीय पातळीवर संमेलन व्हावी, आदी मागण्यांबाबतचे ठराव रविवारी नाट्य परिषदेच्या शाखा अध्यक्षांनी केले.येथील राजर्षी शाहू स्मारक भवनच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शाखांच्या अध्यक्षांचा मेळावा झाला. मेळाव्याचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी होते.नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य प्रफुल्ल महाजन यांनी सांगितले की, नाटकांचे विकेंद्रीकरण होत नसल्याने मुंबई, पुण्यातील नाटके कोल्हापूरसह अन्य ठिकाणी दाखविणे शक्य होत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील प्रायोगिक नाटकांच्या सादरीकरणासाठी अनुदान द्यावे. नाट्य परिषदेची घटना बदलणार आहे. यात राज्य नियामक मंडळावर प्रत्येक जिल्ह्याला शहर व ग्रामीण असे प्रतिनिधित्व मिळावे. सेन्सॉर बोर्डावर सांगली जिल्ह्यातील दोन, रत्नागिरीतील चार तसेच कोल्हापूर वगळता अन्य जिल्ह्याचे सदस्य आहेत. याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे. मात्र, त्याला अजून यश आलेले नाही. अखिल भारतीय नाट्य संमेलनासह विभागीय पातळीवर ठिकठिकाणी संमेलन घ्यावे. राज्य नाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचलेल्या प्रथम क्रमाकांच्या नाटकांचा महोत्सव घेण्याची आमची तयारी आहे, पण संबंधित नाटकांना त्यांच्या निर्मितीचा खर्च शासनाने द्यावा. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्या विना लोकूर, कोल्हापूर शाखेचे कार्यवाह शिवकुमार हिरेमठ, मनोहर कुर्इंगडे यांच्यासह सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.